घरताज्या घडामोडीकोरियोग्राफर शिव शंकर यांचे निधन, सोनू सूदने लिहिली भावनिक पोस्ट म्हणाला...

कोरियोग्राफर शिव शंकर यांचे निधन, सोनू सूदने लिहिली भावनिक पोस्ट म्हणाला…

Subscribe

शिवशंकर यांच्या जाण्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे

दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध कोरिओग्राफर शिव शंकर यांचे कोरोनाने निधन झालं गेली अनेक दिवस ते कोरोनाशी लढा देत होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक दिवसांपासून शिव शंकर यांच्यावर हैद्राबादमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, शिव शंकर यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते. या काळात अनेकांनी त्यांना मदत केली होती. साउथ सुपरस्टार धनुषने शिवशंकर यांना ५ लाखांची मदत केली होती. तर अभिनेता सोनू सूदने देखील शिव शंकर यांच्या मदतीसाठी धावून गेला होता. शिवशंकर यांच्या जाण्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

शिव शंकर यांच्या जाण्याने सोनू सूदने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सोनूने त्याच्या ट्विटवर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्याने असे म्हटले आहे की, ‘शिव शंकर मास्टरजींच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुख: झाले. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण देवाने काही तरी वेगळेच ठरवले होते. मास्टरजींची नेहमी आठवण येईल. परमेश्वर त्यांच्या परिवाराला या दुख:तून सावरण्यासाठी शक्ती देवो. तुम्ही केलेले सिनेमे नेहमीच आम्हाला तुमची आठवण करुन देतील’

- Advertisement -

शिवशंकर यांच्या निधनावर दिग्दर्शक एसएस राजामौलीने देखील दुख: व्यक्त केलं आहे. ‘शिव शंकर मास्टर यांचं निधन झालंय हे ऐकून दुख: झालं. मगधीरा सिनेमात त्यांच्यासोबत केलेलं काम आयुष्यभर लक्षात राहिल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुखा:त सहभागी आहोत’.

शिव शंकर ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. ‘मगधीरा’ या प्रसिद्ध सिनेमातील ‘धीरा धारा’ या गाण्याच्या सर्वोत्तम कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  देण्यात आला होता.


हेही वाचा – Atrangi re Song Chaka Chak : सारा अली खानचा ‘चका चक’ डान्स, अतरंगी रेचं नवं गाणं रिलीज

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -