घरताज्या घडामोडीMumbai : दारुच्या नशेत पोलिसांना मारहाण, दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक

Mumbai : दारुच्या नशेत पोलिसांना मारहाण, दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक

Subscribe

अभिनेत्री काव्या थापरने गुरुवारी सकाळी तिच्या कारने एका माणसाला धडक दिली. धडकेत तो माणूस जखमी झाला. घटनेनंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. घटनेविषयी पोलिसांनी काव्याला विचारले असता तिने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

Kavya Praveen Thapar Arrested : दाक्षिणात्य सिनेमात काम करणारी अभिनेत्री काव्या प्रवीण थापर हिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री काव्या थापरच्या गाडीचा गुरुवारी सकाळी अपघात झाला.  तिच्या कारने एका माणसाला धडक दिली. धडकेत तो माणूस जखमी झाला.  घटनेनंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. अपघात झाला तेव्हा काव्या दारूच्या नशेत होती. घटनेविषयी पोलिसांनी काव्याला विचारले असता तिने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना शिवगाणी करुन मारण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांशी गैरवर्तणूक आणि मद्यावस्थेत गाडी चालवून एका माणसाला जखमी केल्याने तिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

जुहूच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलसमोर काव्याच्या गाडीचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर काव्या तिथे जमलेल्या लोकांशी भांडत करत होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले त्यांच्याशी देखील तिने गैरवर्तन केले. त्यामुळे तिला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अभिनेत्री काव्या थापर ही तमिळ सिनेमात काम करते. तसेच ‘तत्काल’ या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले आहे. त्याचप्रमाणे ‘पतंजली’, ‘मेकमाय ट्रिप’ आणि ‘कोहिनूर’ सारख्या जाहिरातीत काव्या दिसली आहे. ‘ई माया पेरेमिटो’ हा तिचा पहिला तेलुगू सिनेमा २०१८मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तिने ‘मार्केट राजा’ या तमिळ सिनेमातही काम केले.

- Advertisement -

हेही वाचा – Sunny Leone : सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक, सिबिल स्कोर झाला खराब, काय आहे प्रकरण?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -