Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या भावाच्या निघृण हत्येप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक

प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या भावाच्या निघृण हत्येप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक

राकेशची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे विविध ठिकाणी फेकण्यात आले आहेत.

Related Story

- Advertisement -

प्रेमसंबंधाला भावाने विरोध केल्याने दक्षिणेकडील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येप्रकरणी या अभिनेत्रीला अटकही करण्यात आली आहे. कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शनाया काटवे या अभिनेत्रीने तिच्या भावची म्हणजेच राकेश काटवे याची हत्या केली आहे. राकेशची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे विविध ठिकाणी फेकण्यात आले आहेत. राकेशचे कुजलेल्या अवस्थेतील डोके देवरगुडीहल वनक्षेत्रात सापडले, तर उरलेल्या शरीराचे अवयव गाडग रोड व कर्नाटकातील इतर परिसरात आढळून आले. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर राकेशच्या हत्येचा संबंध त्याचीच बहिण शनाया हिच्याशी जोडला गेला. यानंतर याहत्येप्रकरणी पोलिसांनी शनायाला २२ एप्रिल रोजी अटक केली.

 राकेशच्या मृतदेहाचे तुकडे मिळाल्यानंतर धारवड पोलिसांनी नियाझ अहमद कटिगार, तौसिफ चन्नापूर, अल्लाफ मुल्ला आणि अमन गिरणीवाले या तीन संशयितांना ही अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांशी केलेल्या चौकशीदरम्यान शनायाचे आरोपी कटिगारशी असलेले प्रेमसंबंध समोर आले. राकेशला नियाझ अहमद कटिगार आणि शनाया काटवे यांच्या नात्याला विरोध होता. म्हणून कटिगारने त्याला ठार मारण्याचा कट रचला होता. असे चौकशीदरम्यान समजले होते. शनाया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळीला गेली होती. त्याच दिवशी ही हत्या त्यांच्या हुबळीयेथील घरात घडली. राकेशची गळा आवळून खून करण्यात आला होता. एक दिवसानंतर, कटिगार आणि त्याच्या मित्रांनी त्याचे शरीर कापले आणि त्याचे तुकडे शहरातील काही परिसरात फेकून दिले होते.


- Advertisement -

हे वाचा-  जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ चे रिलीज लांबणीवर !

- Advertisement -