Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'उगादी' नववर्षाच्या शुभमुहूर्तां निमित्त दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीने केले तब्बल 8 आगामी चित्रपटांचे...

‘उगादी’ नववर्षाच्या शुभमुहूर्तां निमित्त दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीने केले तब्बल 8 आगामी चित्रपटांचे पोस्टर रिलीज

दक्षिण भारततातही आजच्याच दिवशी 'उगादी' सण हिंदू नववर्षाच्या सुरवात म्हणून साजरा करण्यात येतो

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात हिंदू संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मानल्या जाणार्‍या नवीन वर्षाचा शुभारंभ हा गुढीपाडवा सणाच्या च्यादिवशी होतो. तसेच घरोघरी गोड-धोड जेवण बनवून गुढी उभारली जाते. दक्षिण भारततातही आजच्याच दिवशी ‘उगादी’ सण हिंदू नववर्षाच्या सुरवात म्हणून साजरा करण्यात येतो. आणि याच सणाच अवचित्त साधून तब्बल 8 दक्षिणात्य चित्रपटांचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहेत.

अभिनेता राम चरनने पूजा हेगडेचा ‘आचार्य’ चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटात पूजा नीलांबरीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ‘मे’ महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे काही दिवसांपूर्वी ‘टक जगदीश’ या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण उगादि निमित्त ‘टक जगदीश’ चित्रपटच्या टीममधील कलाकारांनी चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

‘विराट पर्वम’ चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत राणा डग्गुबती यांनी उगादी च्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. या पोस्टरमध्ये सई पल्लवी असून ती ‘विराट पर्वम’ चित्रपटात मुख्य भूमिका सकरणार आहे.

धनुषच्या ‘असुरन’ चित्रपटाचा रिमेक असणारा बहुप्रतिक्षित ‘नारप्पा’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्यंकटेशने शेअर केले आहे. पोस्टर शेअर करतांना व्यंकटेशने लिहिले की, “आशा आहे की या उगादी सणा निमित्त तुम्हाला शांतता व आनंद मिळो ,सुरक्षित राहूया.

‘आरआरआर’ चित्रपटच्या टीमने राम चरण आणि जूनियर एनटीआर या दोघांचा पोस्टर शेअर केला आहे . पोस्टर मध्ये दोघेही सेलिब्रेशन मोडमध्ये दिसत आहेत. चित्रपटच्या पोस्टर वरुण असे दिसत आहे की हे एका गाण्यातील सीन दारम्यान चा फोटो आहे.चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट हिची सुद्धा मुख्य भूमिका असणार आहे.

चैतन्य अक्किनेनी त्यांच्या चाहत्यांना उगादीच्या शुभेच्छा दिल्या तसेच “सुरक्षित” रहाण्यास सांगितले. त्याने आपल्या ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले केले आहे.

अभिनेता मोहन बाबू यानेसुद्धा सन ऑफ इंडिया या चित्रपटाचे पोस्टर चहत्यानसोबत शेअर केले आहे.

बहुचर्चित ‘राधे श्याम’ चित्रपटाचे प्रभासने नवीन पोस्टर शेअर केले असून या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिका सकरणार आहे. प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


हे हि वाचा – अर्जून कपूरच्या कार कलेक्शनमध्ये १ कोटीची लँड रोवर दाखल

- Advertisement -