Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन दक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतीची बॉलिवूडमध्ये एंट्री

दक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतीची बॉलिवूडमध्ये एंट्री

दक्षिणात्य सुपरस्चार विजय सेतूपती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Related Story

- Advertisement -

सध्या अनेक दक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. यातच आता अजून एक अभिनेता बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. दक्षिणात्य सुपरस्चार विजय सेतूपती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. संतोष सिवन दिग्दर्शित आणि शिबु थामिन्स निर्मित ‘मुंबईकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. याबाबत विजयने स्वत: त्याच्या सोशलमीडियाद्वारे माहिती दिली आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीच्या वाढदिवसादिवशी विजयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये विजयसोबत विक्रांत, संजय मिश्रा, रणबीर शौरी, सचिन खेडेकर हे कलाकार दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिनेता विजयने विक्रांत मेस्सीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत.

- Advertisement -

विजय सेतुपती यापूर्वी आमिर खानच्या लाल सिंह चड्डा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. ‘मुंबईकर’ हा चित्रपट तमिळ अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘मानगरम’चा रिमेक असणार आहे. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित करण्यात आला होता. संदीप किशन आणि रेजिना कॅसान्ड्रा हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत दिसले होते.


हे वाचा-  ‘फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ’ यांच्या बायोपिकमध्ये झळकणार विकी कौशल

- Advertisement -