घरठाणेआनंद दिघेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक, दिला आठवणींना उजाळा

आनंद दिघेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक, दिला आठवणींना उजाळा

Subscribe

ठाणे – अभिनेते प्रसाद ओक यांची मुख्य भूमिका असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ठाण्यात शिवसेनेला बळकट करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा एका खासगी वाहिनीवर २१ ऑगस्टला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

मी अचानक त्याच्या पाया पडलो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

यावेळी खासगी वाहिनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कमी वेळामध्ये कामाचा खूप मोठा डोंगर धर्मवीर आनंद दिघे यांनी उभा केला. लोकांचे प्रश्न, अडचणी दूर करणे हे त्यांचे काम होते. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. पण योग जुळून येत नव्हता. प्रसाद ओक यांची लूक टेस्ट पाहिल्यानंतर आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्याची निवड केली आहे असे वाटले. आता तर प्रसाद ओक यांना आनंद दिघे म्हणूनच लोक ओळखू लागले आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान जेव्हा प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या लूकमध्ये समोर आला, ते पाहून मी अचानक त्याच्या पाया पडलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

 धर्मवीर चित्रपटामुळे तो प्रसंग पुन्हा आठवला –

माझ्या दोन्ही मुलांचा जो दुःखद प्रसंग होता त्यामुळे मी आणि माझ संपूर्ण कुटुंब कोलमडून गेलो होतो. तेव्हा राजकरणही सोडूया असं वाटत होते. तेव्हा दिघे साहेबांनी मला सांगितले एकनाथ तुला फक्त आता समाजासाठी जगायचे आहे. तुझे दुःख एकदिवस तुझी सगळ्यात मोठी ताकद असेल. दिघे साहेब त्या प्रसंगामध्ये माझ्या पाठिशी उभे राहिले. ‘धर्मवीर’ जेव्हा मी पाहिला तेव्हा माझ्या आयुष्यातील दुःखद प्रसंग मला पुन्हा एकदा आठवला. आज मी जे काही आहे त्यामागे दिघे साहेब यांचे प्रेम आणि आशिर्वाद आहेत, अशे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -