‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत नाताळ निमित्त अर्जुन आणि रेवंथी चा विशेष लुक

मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जिवाची होतिया काहिली’ या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय.

मालिका आता वेगळ्या वळणावर पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्यात मैत्री झाली आहे आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होताना पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.सध्या अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त रेवथीची धावपळ सुरू आहे. तिला अर्जुनसाठी विशेष असा काही सरप्राईझ बेत अखायचा आहे. नुकतीच त्यांनी मॉलमध्ये जाऊन खरेदी केली आहे. दोघांचे वेगळे बाह्यरूप पाहायला मिळते आहे.

पण या गोंधळात नेमके अप्पा पाहतील म्हणून सॅन्टा क्लॉजचे कपडे घालून ते आप्पांसमोर जातात. हे पाहणं फार मजेशीर ठरणार आहे. त्यांचं हे बाह्यरूप फारच वेगळं दिसतंय आणि क्रिसमस निमित्त २५ डिसेंबर रोजी होणार्या विशेष भागात हे पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा :

शाहरुखचे सिक्स पॅक खोटे… ‘झूमे जो पठाण’ गाणं पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल