घरमनोरंजन"तुम्ही स्पेशल नाहीत की पुन्हा जिवंत..." पूनम पांडे प्रकरणात दिल्ली पोलिसांची विशेष...

“तुम्ही स्पेशल नाहीत की पुन्हा जिवंत…” पूनम पांडे प्रकरणात दिल्ली पोलिसांची विशेष पोस्ट

Subscribe

अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे अखेर समोर आले. तिने एक व्हिडीओ पोस्ट करत ती जिवंत असून लोकांना सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी असे केल्याचे सांगितले. पण, पूनमच्या या विचित्र स्टंटमुळे आता ती ट्रोल होत आहे. अनेकांनी हा आतापर्यंतचा सर्वात वाईट पीआर स्टंट असल्याचे म्हणत तिच्यावर सर्व्हायकल कॅन्सरसारख्या संवेदनशील समस्येचा गैरवापर केला गेल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर सध्या #Poonampandey हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. या ट्रेंडमध्ये आता दिल्ली पोलिसांनी उडी घेत लोकांना रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत जागरूक केले आहे.

दिल्ली पोलिस सोशल मीडियावर ट्रेंडिंग कंटेंटद्वारे दररोज आवाहन करत असतात. अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूच्या अफवेवर दिल्ली पोलिसांनी अनोख्या पद्धतीने लोकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पूनम पांडेचे नाव न घेता लोकांना एक अनोखा संदेश देण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “होय होय, इकडे तिकडे पाहू नका, फक्त तुमच्याबद्दलच बोलणं सुरू आहे. पोलिसांनी याबरोबरच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर लिहिले आहे की, “तुम्ही हो तुम्हीच! तुम्ही अंडरटेकर, मिहिर विराणी किंवा कोणती स्पेशल केस नाहीत की पुन्हा जिवंत व्हाल. त्यामुळे नेहमी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा.” या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी लोकांना रस्ते सुरक्षेबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by DelhiPolice (@delhi.police_official)

 दिल्ली पोलिसांची ही अनोखी पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली, “याबरोबर पूनम पांडेचं नावही यायला हवे होते”. तर दुसऱ्याने लिहिले की, “हा नवीन मीमर कोण आहे?”, तिसऱ्या युजरने लिहिले की, हे दिवसेंदिवस माझे आवडते मीम पेज होत आहे. यावर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, कृपया पूनम पांडेवर गुन्हा दाखल करा आणि कृपया तुमचा पेज अॅडमिन बदला.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय? 
अलीकडेच अभिनेत्री पूनम पांडेच्या अधिकृत इंन्स्टाग्रामवरुन तिच्या टीमने सर्व्हायकल कॅन्सरने पूनमचा मृत्यू झाल्याची पोस्ट करण्यात आली होती. या बातमीच्या अखेर 24 तासांनंतर पूनमने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. व्हिडिओच्या सुरुवातीला पूनमने माफी मागितली, पूनम म्हणाली, सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे केलं. “हजारो महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू होतो. कारण त्यांना माहिती नसतं की काय करायचं पण हा कॅन्सर बरा होऊ शकतो फक्त तुम्हाला काही टेस्ट करुन HPV व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्याला प्राण गमवावे लागू नये म्हणून आपल्याला हे करायला हवं.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -