घरमनोरंजनSpider-Man: No Way Home trailer: 'स्पायडरमॅन' नवीन मिशनवर परतला

Spider-Man: No Way Home trailer: ‘स्पायडरमॅन’ नवीन मिशनवर परतला

Subscribe

स्पायडर 'मॅन फार फ्रॉम होम' या सिनेमाच्या घटनेनंतर आता आगामी सिनेमात पीटर पार्करच्या भूमिकेत स्पायडर मॅनची ओळख जगासमोर होणार आहे.

 

मार्वल स्टूडिओ मधील ‘स्पायडर मॅन नो वे होम’ (spider man no way home) बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आणि अल्पवधीतच सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मार्वल स्टूडिओने त्यांच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवर ‘स्पायडर मॅन नो वे होम’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला असून ट्रेलर पाहून  यंदा स्पायडरमॅन आपल्या नव्या मिशनच्या तयारीला लागला आहे.असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. स्पायडर ‘मॅन फार फ्रॉम होम’ या सिनेमाच्या घटनेनंतर आता आगामी सिनेमात पीटर पार्करच्या भूमिकेत स्पायडर मॅनची ओळख जगासमोर होणार आहे. तसेच सिनेमात दिग्गज कलाकारंची वर्णी लागली आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे मिस्टीरियो यांचा मृत्यूला जबाबदार ठरवल्यामूळे निराश होऊन पीटर पार्कर सिनेमात डॉक्टर स्ट्रेंज यांची मदत घेताना दिसत आहे. तसेच पुन्हा सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.(spider man no way home trailer)

 

View this post on Instagram

 

A post shared by Marvel Entertainment (@marvel)

- Advertisement -

स्पायडर मॅन नो वे होम मध्ये यंदा काही रंजकदार वळण येणार आहे. हा सिनेमा या वर्षीच क्रिसमसमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडमधील लोकप्रिय चित्रपट स्पायडर मॅनचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर स्पायडर मॅनच्या आगामी सिनेमाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.एवेंजर्स एंडगेम सिनेमात आयरन मॅनच्या निधनानंतर हा स्पायडरमॅनवर आधारित दूसरा सिनेमा आहे. अभिनेता टोबी मॅग्वायर याने पहिल्यांदा स्पायडर मॅन सिनेमाच्या 3 भागात पीटर पार्करची भूमिका साकारली होती. तसेच या व्यतीरिक्त द अमेजिंग स्पायडर मॅनच्या दोनही भागात एंड्र्यू गारफील्ड स्पायडर मॅन म्हणून झळकले होतो

- Advertisement -

हे हि वाचा – रणवीरने लावले दीपिका समोर ठुमके, व्हायरल व्हिडिओवर चाहते झाले फिदा

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -