Spiderman No Way Home: ‘स्पायडरमॅन’ चा दमदार ट्रेलर रिलीज ; पीटर पार्करला करावा लागणार ५ खलनायकांचा सामना

Spiderman No Way Home: Powerful Trailer Release of 'Spiderman
Spiderman No Way Home: 'स्पायडरमॅन' चा दमदार ट्रेलर रिलीज ; पीटर पार्कला करावा लागणार ५ खलनायकांचा सामना

मार्वल स्टुडिओच्या आगामी चित्रपट ‘स्पायडर-मॅन नो वे होम’ चा नवीन ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट म्हणजे २०१९ च्या ‘स्पायडर-मॅन फार फ्रॉम होम’चा फॉलोअप आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला टॉम हॉलेंच्या समोर अनेक संकटे येऊन थांबली असून,त्याचे पूर्वीचे दूष्मन पुन्हा त्याच्या आयुष्यात आले आहेत. याशिवाय संपूर्ण मानव जातीला संपवण्यासाठी ते पुन्हा आले आहेत. या खलनायकांमध्ये डॉ. ऑक्टोपस, ग्रीन गोब्लिन, इलेक्ट्रो, सँडमॅन आणि द लिझर्ड यांचा समावेश आहे.

या नवीन ‘स्पायडरमॅन’ चित्रपटात कोण कोण असणार आहे याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून,सोशल मिडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.मात्र आता या चित्रपटात हे पाच खलनायक दिसणार असल्याचे निश्चित आहे. हा चित्रपट देखील अ‍ॅक्शनने भरलेला दिसतो आहे. पीटर पार्कर (टॉम हॉलंड) आणि डॉ. स्टीफन स्ट्रेंज (बेनेडिक्ट कंबरबॅच) यांची केमिस्ट्रीही चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवेल अशी चाहत्यांची खात्री आहे. या चित्रपटात टॉम हॉलंड, जेंडाया, बेनेडिक्ट कम्बरबॅच, जेकब बटालोन, जॉन फॅवरो आणि मारिसा टोमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी १७ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tom Holland (@tomholland2013)

त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रेलर शेअर करताना टॉम हॉलंडने लिहिले की, ‘आम्ही एका थिएटरमध्ये ट्रेलर लाँच केला आणि आम्हाला मिळालेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती. माझ्या स्पायडर-मॅन कारकीर्दीत मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांच्या प्रेम आणि आशिर्वादासाठी मी सदैव ऋणी राहीन. मला आशा आहे की हा चित्रपट तुम्हाला आवडेल.


हे ही वाचा – KBC 13 : हॉट सीटच्या स्पर्धकाची बिग बींनी घेतली धास्ती, म्हणाले – “हा तर माझी पोल खोलेल…