घरताज्या घडामोडीSquid Gameच्या आगामी सीझनमध्ये 'ही' दोन प्रमुख पात्र दिसणार की नाही? काय...

Squid Gameच्या आगामी सीझनमध्ये ‘ही’ दोन प्रमुख पात्र दिसणार की नाही? काय म्हणाले निर्माते

Subscribe

कोरियन भाषेतील वेबसीरिज ‘स्क्विड गेम’ने (Squid Game) नेटफ्लिक्सवरील लोकप्रियेतेच सर्व रिकोर्ड ब्रेक केले आहेत. या थ्रिलर सीरिजने प्रेक्षकांना अक्षरशः वेडचं लावलं आहे. ही कोरियन वेबसीरिज हिंदीसह इतर भाषेत देखील तुम्हाला पाहायला मिळते. सध्या या वेबसीरिजच्या आगामी सीझनची चांगलीच चर्चा रंगली आहे. यादरम्यान वेबसीरिजच्या निर्मात्यांनी दोन प्रमुख पात्र पुन्हा आगामी सीझनमध्ये दिसणार असल्याचा खुलासा केला आहे.

- Advertisement -

स्क्विड गेमचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक ह्वांग डोंग-ह्युक यांनी नुकतेच दुसऱ्या आगामी सीझनसाठी दोन प्रमुख पात्र परतण्याबाबत सांगितले आहे. ह्वांग यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता पार्क हे-सू याबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी आगामी सीझनमधून चाहत्यांना काय अपेक्षा असू शकतात यावर चर्चा करण्यात आली. यावेळी गी-हून आणि फ्रंट मॅन आगामी सीझनमध्ये परतील असा विश्वास ह्वांग यांनी व्यक्त केला. गी-हूनची भूमिका ली जंग- जे (Lee Jung-jae) आणि भूमिका निभावली आहे.

दरम्यान ‘स्क्विड गेम’ या वेबसीरिजमध्ये खेळ खेळा आणि पैसे मिळवा, अशी कथा आहे. पण या वेबसीरिजमधून माणसाच्या जीवापेक्षा पैशाला किती महत्त्व प्राप्त झालं आहे, हे दिसून येतं. या वेबसीरिजचा दुसरा सीझन २०२४च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी ह्वांग डोंग-ह्युक यांनीच दिली वर्तवली होती.

- Advertisement -

हेही वाचा – shivkumar subramaniam: अभिनेते आणि पटकथा लेखक शिव कुमार सुब्रमण्यम यांचं निधन


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -