घरताज्या घडामोडीअभिनेत्री श्रावणीच्या आत्महत्या प्रकरणी निर्मात्याला अटक; तीनही प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

अभिनेत्री श्रावणीच्या आत्महत्या प्रकरणी निर्मात्याला अटक; तीनही प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

तेलगू टीव्ही अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली हीने ८ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या तिच्या तीन प्रियकरांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रावणीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता. तपासानंतर तेलगू अभिनेता देवराज रेड्डी (२४), व्यावसायिक साई कृष्ण रेड्डी (२८) आणि निर्माता अशोक रेड्डी या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. श्रावणी ही गेल्या आठ वर्षांपासून तेलगू टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होती. मनसु ममता या टीव्ही शोने तिला ओळख मिळवून दिली.

८ सप्टेंबर रोजी हैदराबादच्या मधुनगर येथील राहत्या घरात बाथरुमच्या सिलिंगला गळफास घेतलेल्या अवस्थेत श्रावणीचा मृतदेह आढळला होता. श्रावणीच्या कुटुंबियांनी एप्सर नगर पोलीस ठाण्यात तिचा प्रियकर देवराज रेड्डी विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर देवराजने स्वतः पोलिसांसमोर शरण जात आत्मसमर्पण केले होते. मात्र श्रावणीच्या मृत्यूला तिचा माजी प्रियकर साई क्रिष्णा देखील जबाबदार असल्याचे कळताच पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात श्रावणीचा आणखी एक प्रियकर आणि तेलगू चित्रपट निर्माता जी. अशोक रेड्डी यालाही अटक केली. २०१७ साली श्रावणी अशोक रेड्डीच्या संपर्कात होती. प्रेमातो कार्थिक या चित्रपटात त्याने श्रावणीला एक रोल दिला होता. त्यानंतर दोघांमध्ये नाजूक नाते निर्माण झाले होते. अटक झाल्यानंतर अशोक रेड्डीला आज ओस्मानिया रुग्णालयात नेऊन त्याची कोविड चाचणी करण्यात येईल. त्यानंतर त्याला कोर्टात सादर केले जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -