HomeमनोरंजनSridevi : बॉलिवूडची 'चांदनी'! श्रीदेवीबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

Sridevi : बॉलिवूडची ‘चांदनी’! श्रीदेवीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Subscribe

बॉलिवूडची ‘हवाहवाई’अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज (24 फेब्रुवारी) स्मृतिदिन आहे. आज भलेही श्रीदेवी आपल्यात नसेल, पण चाहत्यांच्या हृदयात ती आजही जिवंत आहेत. श्रीदेवीने केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे, तर सौंदर्यानेही लोकांना घायाळ केले होते. आजही तिचे चित्रपट प्रेक्षक आवडीने आवर्जून बघतात. श्रीदेवीला बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ म्हटलं जातं. 24 फेब्रुवारी 2018 या दिवशी श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता.

वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी

श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमधील मीनामपट्टी या गावात झाला. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी ‘कंधन करुणई’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यानंतर 1972 साली ‘रानी मेरा नाम’ या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. 1996 साली श्रीदेवी सिनेनिर्माता बोनी कपूरसोबत लग्नबंधनात अडकल्या. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, केरळ राज्य चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कोट्यवधींमध्ये फी घेणारी पहिली लेडी सुपरस्टार

दमदार अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे आजही श्रीदेवी यांची लोकप्रियता कायम आहे. एकेकाळी जेव्हा सिनेसृष्टीत अभिनेत्रींना समानतेची वागणूक दिली जात नाही असा बोलबाला असताना निर्मात्यांनी श्रीदेवीना चित्रपटात घेण्यासाठी 1 कोटी रुपये मोजले होते. कोटी रुपये फी घेणारी श्रीदेवी पहिली अभिनेत्री होती. श्रीदेवी ही बॉलिवूड अभिनेत्री मानली जात होती की तिला साइन करण्यासाठी मोठे दिग्दर्शक तिच्या घराबाहेर रांगेत उभे असत. इतकंच नाही तर, दिग्दर्शक त्यांना त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी नायकापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार असायचे.

श्रीदेवी यांचे 50 वर्षांत 300 सिनेमे

श्रीदेवी यांनी तीन दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यादरम्यान त्यांनी 300 पेक्षा अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. बॉलिवूडच नव्हे तर, श्रीदेवीने साऊथ चित्रपटांमध्ये काम करून खूप प्रसिद्धी मिळवली. साऊथ सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री अशी श्रीदेवीची ओळख होती. ‘मंद्रू मुदिचू’, ‘सिगप्पू रोजकल’, ‘कल्याणरामन’, ‘जोनी’, ‘मीन्दुम कोकिला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनया करत श्रीदेवीने दक्षिणात्य मनोरंजन विश्वात वेगळे स्थान मिळवले होते. 63 हिंदी, 62 तेलुगू, 58 तामिळ आणि 21 मल्याळम सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. बोनी कपूरसोबत लग्न झाल्यानंतर श्रीदेवी सिनेसृष्टीापासून लांब राहिल्या. त्यानंतर 2012 साली ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी कमबॅक केलं. लग्नानंतर मुख्य भूमिकेत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी या पहिल्या अभिनेत्री होत्या.

या चित्रपटासाठी श्रीदेवी यांनी केलं होतं पार्श्वगायन

श्रीदेवी यांच्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना माहिती असतीलच. परंतु तुम्हाला हे माहितीये का की, त्यांना गाण्याचीही आवडही होती. त्यांनी आपल्याच चित्रपटासाठी आपलंच गाणं गायले होते. या चित्रपटातून श्रीदेवी यांनी अभिनयही केला होता सोबतच पार्श्वगायनही केले होते. श्रीदेवी यांनी ‘गर्जना’, ‘सदमा’, ‘चांदनी’, ‘क्षण क्षणम्’ या चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले होते. ‘चांदनी’ हा चित्रपट 1989 साली प्रदर्शित झाला होता. श्रीदेवी यांचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ हे गाणं अभिनेत्री श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांनी गायले आहे. 1983 साली आलेल्या ‘सदमा’ या चित्रपटातील ‘एक दफा एक जंगल था, जंगल में एक गिदाड था’ हे गाण श्रीदेवी आणि कमल हसन यांनी गायले आहे.