HomeमनोरंजनSridevi : अशी होती बॉलिवूडची हवाहवाई, जाणून घ्या श्रीदेवीबद्दलच्या 5 खास गोष्टी

Sridevi : अशी होती बॉलिवूडची हवाहवाई, जाणून घ्या श्रीदेवीबद्दलच्या 5 खास गोष्टी

Subscribe

बॉलिवूडची हवाहवाई अर्थात अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नाही. मात्र, तिच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. श्रीदेवीचे कातिलाना सौंदर्य आणि अभिनय प्रयत्न केला तरीही विसरता येणे अशक्यच! बॉलिवूड सिनेविश्वाला दर्जेदार सिनेमे देणारी ही अभिनेत्री वयाच्या 54 व्या वर्षी संपूर्ण कलाविश्वाला चटका देऊन गेली. श्रीदेवी अशी अभिनेत्री होती जिच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक अभिनेता इच्छुक होता. नायकप्रधान सिनेसृष्टीत 80 च्या दशकात दक्षिणेतून आलेल्या ‘श्रीदेवी’ने जबरदस्त कारकीर्द गाजवली. (sridevi special article about her likes and dislikes)

श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमधील मीनामपट्टी या गावात झाला. वयाच्या चौथ्या वर्षी तिने ‘कंधन करुणई’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पुढे 1972 साली ‘रानी मेरा नाम’ सिनेमातून तीने बॉलिवूड डेब्यू केला. त्यावेळी ती फक्त 9 वर्षांची होती. यानंतर बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत ती झळकली. 1996 साली श्रीदेवीचे बोनी कपूरसोबत लग्न झाले आणि 1997 जान्हवीचा तर 2000 साली ख़ुशीचा जन्म झाला.

श्रीदेवीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, केरळ राज्य चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीचे निधन झाले. अभिनेत्रीच्या निधनानंतरही तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. असे असले तरीही ती नक्की कशी होती? तिला काय आवडायचं? काय नाही आवडायचं? याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. यापैकी 5 गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.

1) .. तेव्हा प्रचंड राग यायचा

श्रीदेवीने एका मुलाखतीत आपल्याला सगळ्यात जास्त राग कधी येतो याविषयी सांगितले होते. तेव्हा अभिनेत्री म्हणाली होती, ‘जेव्हा बोनी मला माझ्या वयाची आठवण करून देतात तेव्हा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या वयाबद्दल ऐकायला अजिबात आवडत नाही’. तसेच यावेळी अगदी मिश्किल अंदाजात तिने असेही म्हटले, ‘जेव्हा लोक मला मी 50 वर्ष इंडस्ट्रीत काम केलंय असं सांगतात आणि मी इतरांपेक्षा मोठी असल्याचे जाणीव करून देतात तेव्हाही मी नाराज होते’.

2) स्किनकेअरबाबत नो कॉम्प्रोमाईज

अभिनेत्री श्रीदेवीच्या सौंदर्याबद्दल बोलू तितके कमीच. उगाच सगळे अभिनेते त्यांच्यामागे फिदा थोडीच होते. श्रीदेवीसोबत एकदा तरी काम करण्याची संधी मिळावी म्हणून कितीतरी अभिनेते लाईनमध्ये असायचे. कुणालाही प्रेमात पाडेल असे सौंदर्य टिकवण्यासाठी ती आपल्या त्वचेची फार काळजी घ्यायची. शिवाय आपला लूक आणि मेकअप याकडेही ती विशेष लक्ष द्यायची. आपल्या त्वचेसाठी काय योग्य काय अयोग्य हे जाणून घेतल्यानंतर ती एखादं प्रोडक्ट वापरायची. अभिनेत्रींच्या निकटवर्तीयांपैकी बरेच लोक सांगतात की, एखाद्या कार्यक्रमाला जाण्याआधी तिला तयारीसाठी तासनतास लागायचे.

3) साडीवर विशेष प्रेम

श्रीदेवी बॉलिवूडची फॅशन दिवा होती. कोणत्याही प्रकारे अंगप्रदर्शन न करता स्टाईल कशी करायची हे तिला चांगलं ठाऊक होतं. त्यामुळे पाश्चिमात्य कपड्यांऐवजी तिचे साड्यांवर विशेष प्रेम होते. कोणताही समारंभ असो वा सोहळा तिला साडी नेसायला फार आवडायचं. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेली तरी ती स्वत:साठी उत्तमोत्तम साड्या खरेदी करायची.

4) उत्तम गृहिणी ते किचन क्वीन

एक उत्तम अभिनेत्री असताना श्रीदेवी एक गृहिणी म्हणूनही तितकीच यशस्वी होती. एक प्रेम आई आणि पत्नी म्हणून आपल्या कुटुंबाला काय हवं काय नको याची ती व्यवस्थित काळजी घ्यायची. विशेष म्हणजे, स्वतःच्या किचनमध्ये ती स्वतःचं काम करायची. जेवण ते स्वच्छता सर्व गोष्टींची श्रीदेवी स्वतः काळजी घ्यायची.

5) प्रेमळ आणि आदर्श आई

इतर स्त्रियांप्रमाणे काम, घर आणि संसार एकहाती चालवण्याचे कौशल्य श्रीदेवीकडेही होते. ज्याचा तिने कायम वापर केला. आपल्या मुलींकडे दुर्लक्ष होऊ न देता तिने अभिनय क्षेत्रात काम केलं. आपल्या मुलींची ती विशेष काळजी घ्यायची. याबाबत स्वत: जान्हवी कपूरने सांगितले आहे. ती म्हणाली, ‘माझी आई माझ्याकडून प्रत्येक क्षणाचे अपडेट्स घ्यायची. खूप काळजी करायची. ‘धडक’च्या सेटवर तीसुद्धा माझ्यासोबत यायची. इतकंच काय तर दिवसभरात किमान एकदातरी ती शांतपणे बसून आम्हा दोघींशी गप्पा मारायची.

हेही पहा –

Comedian Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरेला जबर मारहाण, अभिनेत्यावर केलेला विनोद अंगलट