घरताज्या घडामोडीSRKचा टीम ट्रिनबागो नाइट राइडर्सवरील 'वी आर टीकेआर' शॉर्टफिल्म प्रदर्शित

SRKचा टीम ट्रिनबागो नाइट राइडर्सवरील ‘वी आर टीकेआर’ शॉर्टफिल्म प्रदर्शित

Subscribe

टीकेआरच्या आतापर्यंतच्या प्रवासातील चढउतार प्रेक्षकांना पहायला मिळणार

बॉलीवूड किंग शाहरुख खानची (Shahrukh Khan) चॅम्पियन टीम ट्रिनबागो नाइट रायडर्सने (TKR) नुकतीच एक शॉर्टफिल्म प्रदर्शित केली आहे. ‘वुई आर टीकेआर’ हा लघुपट कॅरेबियन प्रीमियर लीग 20-20 (CPLT20) मधील ट्रिनबागो नाईट रायडर्सचा आज वरचा सर्वात यशस्वी प्रवास प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. (SRK team screened ‘We Are TKR’ short film on Trinbago Knight Riders)

- Advertisement -

 

टीकेआर ही 4 CPL ट्रॉफी पटकावणारी पहिली टीम असून नाबाद चॅम्पियनशीप सिझन जिंकण्याचा पहिला बहुमानही या टीमने मिळवला आहे. या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून आपल्या प्रवासाची झलक चाहत्यांना देण्याचा TKRचा मानस आहे. या माध्यमातून टीकेआरच्या आतापर्यंतच्या प्रवासातील चढउतार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

- Advertisement -

नाईट रायडर्स समूहाचा सहमालक असलेल्या शाहरुखने यासंदर्भात बोलताना सांगितले की, “जेव्हा वेंकी मैसूर म्हणाले की आपल्याकडे सीपीएलचा हिस्सा बनण्याची तसेच ट्रिनबागो नाईट रायडर्स मिळवण्याची संधी आहे तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण याविषयी मला विशेष प्रेम आणि जवळीक वाटते. मला संगीताची कल्पना आवडली. ज्याप्रकारे लोक येथे नृत्य करतात आणि खुश होतात ते येथे खेळापेक्षा थोडे अधिक आहे. संपूर्ण समुदाय एकत्र येतो आणि आनंद घेतो. वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेटचा इतका मोठा
वारसा आहे.”


हेही वाचा – Bhoot Police : सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -