एसएस राजामौली आणि संगीतकार एमएम किरावानी यांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावरील व्हिडीओ डान्स व्हायरल

साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआरच्या RRR चित्रपटाने आपली ताकद फक्त भारतीय बॉक्स ऑफिसवरच नाही तर संपूर्ण जगभरात दाखवली. या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले. नुकत्याच 2-3 दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’देण्यात आला आहे. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटाच्या टीमसोबतच भारतीय प्रेक्षक देखील आनंदी झाले आहेत. भारतामध्ये जवळपास दोन दशकांनंतर हा पुरस्कार आला आहे.

दरम्यान, हा पुरस्कार हातात घेतल्यानंतर या गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौलींचा यांचा नाटू नाटू गाण्यावरील डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एसएस राजामौली आणि एमएम कीरावानी यांनी नाटू नाटू गाण्याची स्टेप केली आहे. शिवाय यावेळी दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

दरम्यान, भारतामध्ये जवळपास दोन दशकांनंतर हा पुरस्कार आल्याने भारतीय प्रेक्षकांकडून चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं जात आहे. शिवाय बॉलिवूड कलाकारांनी देखील चित्रपटाच्या टीमवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

 

 


हेही वाचा :

सुनील शेट्टीच्या लेकीच्या लग्नात ‘हे’ दिग्गज कलाकार लावणार हजेरी