Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन एसएस राजामौली बनवणार महाभारतावर आधारित 10 भागांचा चित्रपट

एसएस राजामौली बनवणार महाभारतावर आधारित 10 भागांचा चित्रपट

Subscribe

‘बाहुबली’चे दिग्दर्शक एसएस राजामौली नेहमीच त्यांच्या दर्जेदार भव्य चित्रपटांमुळे चर्चेत असतात. राजामौली काही महिन्यांपासून त्यांच्या बहुचर्चित ‘RRR’ चित्रपटामुळे चर्चेत होते. अशातच, आता एसएस राजामौली भारतीय पौराणिक कथा महाभारतावर आधारित चित्रपट तयार करणार आहेत.

एसएस राजामौली बनवणार महाभारतावर आधारित 10 भागांचा चित्रपट

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

अलीकडेच याबद्दल बोलताना दिग्दर्शक एसएस राजामौली म्हणाले, ‘मी जर महाभारत बनवला तर माझे संपूर्ण वर्षभर महाभारताच्या आवृत्तीचा अभ्यास करण्यात जाईल, जी अजूनही देशात उपलब्ध आहे. आत्ता मी फक्त 10 भागांमध्ये बनवण्याचा विचार करू शकतो. मला असे वाटते की, महाभारत चित्रपट बनविण्यासाठी मी काहीतरी शिकत आहे. हे कर माझे स्वप्न आहे आणि माझे प्रत्येक पाऊल त्या दिशेने पुढे जात आहे.

वेगळ्या अंदाजात बनवणार चित्रपट

- Advertisement -

मागील काही दिवसांपूर्वी राजामौली या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणाले होते की, “मी महाभारतासाठी जी व्यक्तिरेखा लिहिणार आहे, ती व्यक्तिरेखा तुम्ही आतापर्यंत वाचल्या किंवा पाहिल्यासारखी नसेल. मी माझ्या पद्धतीने महाभारत चित्रपट घडवणार आहे. ज्यामध्ये कथा सेम असेल. पण त्यातील पात्रे खूप वेगळी असतील आणि त्यांचे नाते एकमेकांपेक्षा खूप वेगळे असेल.

दरम्यान, दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या सुपरस्टार महेश बाबूच्या पुढील चित्रपटात व्यस्त आहेत. सध्या याला SSMB 29 म्हटले जात आहे. सध्या हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. तसेच, चित्रपटाचे कास्टिंग अद्याप सुरू झालेले नाही.


 हेही वाचा : ‘भोला’ आता OTT वर ; पण मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -