घरमनोरंजन'राधा प्रेम रंगी रंगली'चे कलाकार बिग बॉसच्या घरात!

‘राधा प्रेम रंगी रंगली’चे कलाकार बिग बॉसच्या घरात!

Subscribe

आज बिग बॉसच्या घरात 'राधा प्रेम रंगी रंगली'चे कलाकार येणार आहेत. या कलाकारांसोबत आज बिग बॉसचे बीबी हॉटेलमध्ये रुपांतर होणार असून पाहुण्यांचा योग्य तो पाहुणचार करण्यात येणार आहे. हा पाहुणचार कसा करण्यात येणार हे पाहणे प्रेक्षकांकरता रंजक असणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच वीणा जगताप. तसेच लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे कलाकार येणार आहेत. या कलाकारांबरोबर बिग बॉसच्या घरात आज एक आगळावेगळा टास्क रंगणार आहे.

radha prem rangi rangli in big boss marathi house
राधा प्रेम रंगी रंगलीचे कलाकार

आज काय स्पेशल?

आज बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य व्हावे यासाठी बिग बॉसचे बीबी हॉटेलमध्ये रुपांतर होणार आहे. ‘सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य करायचे’ असे बिग बॉस सांगणार असून सई घराची कॅप्टन असल्याने या हॉटेलची ती मॅनेजर असणार आहे. घरात आलेल्या कलाकारांची घरातील सदस्यांना उत्तम सेवा करायची आहे. यावेळी मनोरंजन करण्यासाठी पुष्करने एक छान लावणी देखील सादर केली आहे. हे सगळे मिळून बीबी हॉटेलमध्ये आलेल्या अतिथींची कशी काळजी घेणार? कोणते टास्क त्यांना मिळणार? हे आजच्या भागात बघायला मिळणार आहे.

- Advertisement -
laxmi sadaiv mangalam
लक्ष्मी सदैव मंगलम् कलाकार

रंगला नॉमिनेशन टास्क

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “पैसा फेक तमाशा देख” हा नॉमिनेशन टास्क खेळला गेला. घरामध्ये बैलगाडी ठेवण्यात आली. सई बिग बॉस मराठीच्या घराची कॅप्टन असल्याने ती सुरक्षित होती. काल नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रेशम, आस्ताद आणि स्मिता नॉमिनेट झाले, तर मेघा, शर्मिष्ठा, पुष्कर हे या आठवड्यामध्ये सुरक्षित झाले.

दोन आठवडे महत्त्वाचे

बिगबॉस मराठीच्या घरात आता शेवटचे दोन आठवडे उरले आहेत. त्यामुळे हे दोनही आठवडे सदस्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. या आठवड्यात बिगबॉसकडून दिले जाणारे टास्क स्पर्धकांनी पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये कोण धडकणार? कोण होणार पहिल्या मराठी बिग बॉसचा विजेता? या सगळ्याची उत्सुकता आता स्पर्धकांबरोबरच प्रेक्षकांनाही लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -