घरमनोरंजन‘फर्जंद’ मावळ्यांचे शौर्य

‘फर्जंद’ मावळ्यांचे शौर्य

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून स्टार प्रवाह या वाहिनीने ‘फर्जंद’ हा चित्रपट १७ फेब्रुवारीला एकाच दिवशी दोन वेळा दाखवण्याचे ठरवलेले आहे. दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता हा चित्रपट पहाता येईल. शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेच. ‘फर्जंद’ का पहावा तर शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात बिन्नीचे जे लढवय्ये मावळे होते, त्यात फर्जंद हा एक होता. त्याचे नाव कोंडाजी फर्जंद. एक योद्धा अशी त्याची ओळख आहे. अवघ्या साठ मावळ्यांना सोबतीला घेऊन अडीच हजार मुघल सैनिकांचा त्याने पराभव केला होता. त्याची यशोगाथा म्हणजेच ‘फर्जंद’ चित्रपट सांगता येईल.

‘फर्जंद’ हा फक्त कुशल योद्धाच नव्हता तर हुशार, बुद्धीमानसुद्धा होता. त्याची शरीरयष्टी हीच तो कर्तृत्त्ववान असल्याची सांगणारी होती. ही मुख्य भूमिका अंकीत मोहन या अभिनेत्यावर सोपवलेली आहे. चिन्मय मांडलेकर हा यात शिवाजी झालेला आहे. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटींचा मुख्य भूमिकेसह सहभाग आहे. मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, लिखिल राऊत, आस्ताद काळे, हरिश दुधाडे यांच्या यात भूमिका पहायला मिळतात. दिग्पाल लांजेकर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. यानिमित्ताने शिवकालीन इतिहास जागवला जाणार आहे , तोही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -