घरताज्या घडामोडीसौंदर्याचं कारस्थान कार्तिकसमोर होणार उघड!

सौंदर्याचं कारस्थान कार्तिकसमोर होणार उघड!

Subscribe

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिक एका नव्या वळवावर आली आहे. या मालिकेतील सौंदर्या काळ्या रंगाचा खूप द्वेष करत असते. त्यामुळे सौंदर्या दीपाचा तिरस्कार करत असते. दीपा कार्तिकपासून कशी दूर राहिल याची नेहमी काळजी घेत असते. सौंदर्या दीपाला कार्तिकपासून दूर ठेवण्यासाठी काहींना काही प्लॅन करत असते. कार्तिकचे दीपावर खूप प्रेम असल्याचे कळल्यावर सौंदर्याने कार्तिकचे लग्न दीपाऐवजी तिची बहीण श्वेताशी करण्याचा डाव रचला. पण सौंदर्याच्या या डावाला यश आले नाही.

सौंदर्याची मुलगी लावण्याने हा डाव उधळून लावला. त्यामुळे सौंदर्याच्या घरात दीपाने सून म्हणून पाऊल ठेवले. पण सौंदर्याचे इथेही सूडचक्र काही थांबले नाही. दीपा कार्तिकपासून दूर राहण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केले आहेत. दरम्यान सौंदर्याचे खरे रुप दीपा समोर आलेच आहे. आता कार्तिकसमोर त्याच्या आईचे खरे रुप उघड होण्याची वेळ आली आहे. कार्तिकला आपल्या आईचे कारस्थान कळेल का? हे आपल्याला येत्या महाएपिसोडला कळणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण या मालिकेचा येत्या रविवारी २० सप्टेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता महाएपिसोड असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुशांतला चाहत्याने दिली अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली, तयार केला मेणाचा पुतळा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -