घरCORONA UPDATE कोरोनाविरोधी लढण्यात बॉलिवूड कलाकारांची लाखमोलाची मदत!

 कोरोनाविरोधी लढण्यात बॉलिवूड कलाकारांची लाखमोलाची मदत!

Subscribe

कोरोनाच्या या कठीण काळात बॉलिवूडकरांनी देशासाठी खूप मदत केली. शाहरूख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अजय देवगण, कार्तिक आर्यन अशा अनेक बॉलिवूडकलाकारांनी मदतीचा हात कायमच पुढे केला. नुकतेच बॉलिवूड कलाकारांनी I FOR INDIA  या एका खास कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात आमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या अनेक कलाकारांनी भाग घेतला होता. फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे ब्रॉडकास्ट करण्यात आले होते.

या कार्यक्रमात काही कलाकारांनी गाणी गायली, कथा-कविता वाचून दाखवल्या, काही जणांनी स्टँड अप कॉमेडी केली, तर काही जणांनी विविध प्रकारची वाद्ये वाजवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जवळपास चार कोटी ३० लाख प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकारांनी जवळपास ५२ कोटी रुपयांचा मदत निधी उभारला. हे सर्व पैसे त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी सरकारकडे सुपूर्त केले आहेत.

- Advertisement -

चित्रपट निर्माता करण जोहरने सोमवारी ट्विटरवर ही माहिती दिली. करणने ट्वीटरवर लिहिले आहे की, “अंतःकरणापासून तुम्ही हा कार्यक्रम  बघितल्याबद्दल धन्यवाद देतो. तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. देणगी दिल्याबद्दल धन्यवाद #IForIndia मैफिली म्हणून प्रारंभ झाला. पण ती एक चळवळ आहे. चला एक सुरक्षित,  निरोगी आणि सशक्त भारत बनवूयात. आय फॉर इंडिया. तुम्हीही सहभागी व्हा..कृपया देणगी द्या”.

- Advertisement -

हे ही वाचा – रामायणातील रावणाच्या निधनाच्या अफवांना पुर्णविराम, स्वत: ट्वीट करत केला खुलासा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -