बॉलिवूड मधील द्ग्गज कलाकार निना गुप्ता नेहमी चर्चेच्या झोतात असते. तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा व्यक्तीगत खाजगी आयुष्यातील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना दिसतात. तसेच निना यांची गणना बॉलिवूड मधील अश्या अभिनेत्रीमध्ये होते ज्या दिलखुलासपणे आपले आयुष्य जगतात तसेच रोख ठोक अंदाजात आपले मत मांडतात. अभिनेत्री निना गुप्ता करियर,मूल आणि महिलांचे अधिकार अशा विषयांवर आपले विचार मुद्दे नेहमी स्पष्टपणे सर्वांसमोर मांडते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची चौकट मोडून निनाने जगाला उदाहरण दिलं आहे. एकीकडे निना सिंगल मदर म्हणून मसाबा हिचे पालन पोषण केलं आहे तर दुसरीकडे वायच्या 50 शी मध्ये तिने 2008 साली विवेक मेहरा सोबत लग्न केले होते. या विवाहानंतर दोघेही वेगवेगळ्या शहरात वास्तव्य करत होते. नुकतच निना गुप्ताने खुलासा केला आहे की गेल्या वर्षी लॉक डाऊन दरम्यान तिला विवेक सोबत वेळ घालवण्याची पुरेपूर संधि प्राप्त झाली आहे. आम्ही दोघेही पहिल्यांदा पती-पत्नी सारखे राहिलो. अशी माहिती निनाने दिली आहे.
View this post on Instagram
निना आणि विवेक यांची भेट लंडन ते मुंबई फ्लाइट दरम्यान झाली होती. दोघेही एकमेकांना पसंत करू लगले. निना ला आधीच एक मुलगी आहे हे जाणून विवेक ला काहीच आपत्ति नसल्याचे त्याने स्पष्ट केले. आणि सन 2008 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. एकमेकांपासून दूर राहूनही दोघांची बॉंडिंग नाते हे एकरूप आहे. एका मुलाखती दरम्यान निना ने दोघांच्याही नात्याबद्दल विचारले असता निना ने सांगितले की.”गेल्या वर्षी लॉक डाऊन दरम्यान मी आणि विवेक मुक्तेश्वर मध्ये सहा महीने राहिलो होतो. विवेक दिल्ली मध्ये राहतो आणि मी मुंबई. नेहमीच आमची साथ अशाच प्रकारे राहिली आहे. असं पहिल्यांदाच घडलं की आम्ही लॉक डाऊनमुळे इतके दिवस एकत्र राहिलो. तसेच पहिल्यांदा त्याने माला ओळखले आणि मी त्याला.” निना गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच विवेक मेहरा सोबत अनेक पोस्ट शेअर करत असते. निनाचे चाहते नेहमीच तिचे कौतुक करतात.
हे हि वाचा – मुकेश आणि महेश भट्ट यांच्या व्यावसायिक दूरव्याबद्दल इम्रान हशमीने केला खुलासा म्हणाला…