उर्फी जावेदसोबत घडला विचित्र प्रकार; ट्वीट करून दिली माहिती

उर्फी जावेद हिला नुकतेच एका विचित्र प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. तिने याबाबतची माहिती तिच्या ट्विटरवरून दिली आहे. दिल्लीमध्ये एक कॅब चालक तिची कपड्यांची बॅग घेऊन निघून गेल्याची माहिती तिच्याकडून देण्यात आली आहे.

strange incident happened with Urfi Javed

उर्फी जावेद हिला नुकतेच एका विचित्र प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. तिने याबाबतची माहिती तिच्या ट्विटरवरून दिली आहे. दिल्लीमध्ये एक कॅब चालक तिची कपड्यांची बॅग घेऊन निघून गेल्याची माहिती तिच्याकडून देण्यात आली आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे कायमच चर्चेचा विषय बनलेली असते. तर यामुळे तिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत महिला आयोगाकडे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर उर्फीने ट्विटरवरून चित्रा वाघ यांना जेरीस आणले होते. चित्रा वाघ उर्फीच्या कपड्यांबद्दल बोलल्याने तिने वाघ यांना सासू म्हणत डिवचले होते. पण आता उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

तर झाले असे आहे की, उर्फीने दिल्ली येथे सहा तासांच्या प्रवासाकरिता एक चारचाकी वाहन म्हणजेच उबेर कॅब बुक केली होती. प्रवास सुरु झाल्यानंतर उर्फीने जेवण करण्यासाठी ही कॅब एका ठिकाणी थांबवली. पण ती जेऊन बाहेर येईपर्यंत कॅब चालक तिचे गाडीतील सामान घेऊन पळून गेला होता. यानंतर उर्फीने तिच्या एका मित्राला याबाबत फोन करून माहिती दिली. तिच्या फोननंतर तिचा मित्र तिच्या मदतीसाठी आला. तिच्या मित्राने त्या उबेर चालकाला सतत फोन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो कॅब चालक दोन तासानंतर उर्फी असलेल्या ठिकाणी आला, पण तो त्यावेळी संपूर्ण नशेत असल्याची माहिती उर्फीकडून ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबतची पोस्ट उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील पोस्ट केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘उबर कृपया काहीतरी करा. हे महिलांच्या सुरक्षिततेच्या विरोधात आहे. मला खूप वाईट अनुभव आला आहे. आधी ड्रायव्हरने माझे सामान घेतले आणि नंतर दोन तासांनी मद्यधुंद अवस्थेत परतला.’ या घटनेनंतर उर्फीची उबेरकडून माफी मागण्यात आली आहे. पण उर्फीसोबत आजवरची सगळ्यात विचित्र घटना घडली असल्याचे तिच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – मुस्लीम तरुणाशी लग्न केल्यानंतर स्वराला विहिंपने करून दिली श्रद्धा हत्याकांडाची आठवण