Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन पुण्यातील FTIIच्या विद्यार्थ्यांचा 'द केरल स्टोरी' सिनेमाच्या स्क्रिनिंगला विरोध

पुण्यातील FTIIच्या विद्यार्थ्यांचा ‘द केरल स्टोरी’ सिनेमाच्या स्क्रिनिंगला विरोध

Subscribe

एफटीआयआयने २०२० सालच्या तुकडीतील पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित गुणांकन नसणे, या कारणास्ताव काढून टाकले होते.

‘द केरल स्टोरी’ या सिनेमा प्रदशित झाल्यापासूनच या ना त्या कारणाने वादच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता सिनेमाला पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाचे स्क्रिनिंग एफटीआयआयमध्ये आयोजित करण्यात आले होते. परंतु, विद्यायार्थ्यांच्या एका गटाने सिनेमाच्या स्क्रिनिंगला ( Cinema Screening) विरोध केला. या गटाने एफटीआयआयच्या (FTII) परिसरात मोठे आंदोलन पुकारले. पण, या विद्यार्थ्यांच्या विरोधला न जुमानता ‘द केरल स्टोरी’ सिनेमाचे स्क्रिनिंग सुरूच ठेवण्यात आले.

दरम्यान, सिनेमाचे स्क्रिनिंग सुरू असताना ‘द केरल स्टोरी’ची स्टार कास्टही उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. एफटीआयआयमध्ये आज सकाळी ९ वाजता सिनेमाच्या स्क्रिनिंग आयोजत केले होते. यावेळी एफटीआयआयमधील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने विरोध केला. सिनेमा सुरू होण्यापूर्वीच दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कारणास्तव आंदोलन सुरू आहे. परंतु, आज ‘द केरल स्टोरी’ सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दिशा बदलली. एफटीआयआयने २०२० सालच्या तुकडीतील पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित गुणांकन नसणे, या कारणास्ताव काढून टाकले होते. या विरोधात विद्यार्थी एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनचे गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरू केले आहे, तर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ४० वा दिवस तर उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

‘द केरल स्टोरी’ सिनेमा २०० कोटीचा टप्पा पार करणार

- Advertisement -

या सिनेमाच्या स्क्रिनिंगलाही विद्यार्थ्यांच्या संघटनांनी विरोध केला. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सिनेमाचे स्क्रिनिंग पार पडले. या सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या १५ दिवसांत जवळपास १५० कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे. हा सिनेमा लवकरच २०० कोटी टप्पा पार करणार असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने बॉलिवूडच्या बड्या ६ सिनेमांना मागे टाकले आहे.


 

हेही वाचा – The Kerala Story काल्पनिक, निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात कबुली; चित्रपटाच्या सुरुवातीलाच करणार खुलासा

- Advertisment -