साऊथ अभिनेता विजय सेतुपतीचा आगामी चित्रपट ‘विदुथलाई’चे शूटिंग दरम्यान 54 वर्षाच्या स्टंट मास्टर एस सुरेशचे निधन झाले आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना स्टंट मास्टर 20 फूट उंचावरुन खाली कोसळला. ही घटना शूटिंगच्या सेट झाली आहे. खरंतर एस सुरेश या चित्रपटामध्ये स्टंट दिग्दर्शकासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.
स्टंट मास्टर सुरेशचा मृत्यू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टंट मास्टर एस सुरेश एक स्टंट करायचा होता. ज्यामध्ये त्याला 20 फूट उंचावरुन खाली उडी मारायची होती. मात्र, दुर्दैवाने क्रेनला दोरीने बांधलेले असूनही दोरी तुटली आणि तो खाली कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांकडून तपास सुरु
सेटवर झालेल्या या दुर्घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मागील 25 वर्षापासून सुरेश चित्रपटसृष्टीत काम करत होता. तो आधीपासूनच स्टंट मॅन होता. ‘विदुथलाई’ या चित्रपटामध्ये अभिनेता विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची शूटिंग दोन भागात होणार आहे. दरम्यान, आता हा प्रकार घडल्यामुळे शूटिंग बंद करण्यात आलं आहे.
सत्यमंगलमच्या जंगलात करण्यात आले शूटिंग
या आधी विजयने सांगितलं होतं की, चित्रपटाच्या पहिल्या पार्टचे शूटिंग संपले असून दुसऱ्या पार्टचे शूटिंग करताना हा प्रकार घडला. क्राईम-थ्रिलर शैलीतील या चित्रपटात सुरी, विजय सेतुपति तसेच प्रकाश राज, गौतम मेनन, किशोर, भवानी श्री, राजीव मेनन, चेतन यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील बहुतांश दृश्ये सत्यमंगलमच्या जंगलात शूट करण्यात आली आहेत.
हेही वाचा :