Samantha आणि Naga Chaitanyaच्या घटस्फोटामागे ‘या’ व्यक्तीचा हात

stylist preetham jukalkar the reason of samantha and naga chitanya divorce
Samantha आणि Naga Chaitanyaच्या घटस्फोटामागे 'या' व्यक्तीचा हात

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य अक्किनेनी (Naga Chaitanya Akkineni) यांच्या घटस्फोटानंतर दोघांबद्दल चांगलीच चर्चा सुरू आहे. यांच्या घटस्फोटामागच्या कारणांसंबंधित अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. सामंथा आणि नागाचा घटस्फोट का झाला? याबाबत प्रत्येक जण आपल्याकडे असलेल्या माहिती प्रमाणे सांगत आहेत. पण यादरम्यान सामंथाचा स्टाईलिस्ट प्रीतम जुकलकरचे नाव समोर येत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार सामंथा आणि नागा विभक्त होण्यामागे सामंथाचा बेस्ट फ्रेंड आणि स्टाईलिस्ट प्रीतम जुकलकरचा हात आहे. (stylist preetham jukalkar the reason of samantha and naga chitanya divorce)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

सामंथा आणि प्रीतम यांची मैत्री यापूर्वी सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहायला मिळाली आहे. यादरम्यानच त्या मैत्रीवर लोकांनी प्रश्न उपस्थित करत आहेत. सामंथाचा घटस्फोटामागे प्रीतम याच्यासोबत असलेली मैत्रीच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान काही वेळापूर्वी प्रीतमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यानंतर त्याने नंतर ती पोस्ट डिलीट केली. या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘जे लोकं घरात खरेपणा लपवत असतात, तेच त्यांच्या हिंसेला जबाबदार असतात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

सामंथा आणि नागाच्या घटस्फोटाच्या मागे प्रीतम जुकलकर हे एक कारण असले तरी यामागचे आणखीन कारणे समोर येत आहेत. सामंथाचे कुटुंब वाढवण्याचा विचार करणे, तिला चित्रपटात बोल्ड सीन करण्यास परवानगी न देणे आणि अक्किनेनी कुटुंबांचा दोघांच्या आयुष्यात जास्त दखल घेणे, अशी अनेक कारणे सामंथा आणि नागाच्या घटस्फोटामागे असल्याचे सांगितले जात आहेत. परंतु अजूनपर्यंत सामंथा आणि नागाने घटस्फोटामागच्या कारणांचा खुलासा केला नाही आहे. मात्र चाहते अनेक तर्क वितर्क लावत आहेत.


हेही वाचा – Viral Post: घटस्फोटनंतर सामंथा नागा चैतन्याला म्हणते, ‘मैं तुम्हारी हूं और तुम मेरे’!