अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या चित्रपट आणि मालिकांमधील वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी चर्चेत आहे. काशिनाथ घाणेकरांवरील बायोपिक आणि छोट्या पडद्यावरील विक्रांत सरंजामे या भूमिकांमुळे सुबोध भावेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या भूमिकांबाबत नेहमीच प्रयोगशील राहणारा सुबोध पुन्हा एकदा एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्यासमोर येण्याच्या तयारीत आहे. सध्या सुबोधचा अगडबम लुक सर्वत्र व्हायरल होत आहे. जाडजुड झालेला सुबोध भावे जरा वेगळंच भासतोय. त्याचा हा फॅट लुक सुबोधने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
वाचा : सुबोध भावे – श्रुती मराठेच्या लग्नाची ‘पत्रिका’!
‘अगडबम ३’ चा लुक?
अभिनेता सुबोध भावेचा या वर्षी प्रदर्शित झालेला आणखी एक चित्रपट म्हणजे ‘अगडबम २’. यामध्ये दिग्दर्शक-निर्माती आणि अभिनेत्री तृप्ती भोईरच्या पतीची भूमिका सुबोधने साकारली होती. जाडजूड नाजूकापासून प्रेरीत होऊन ‘अगडबम ३’ चित्रपटासाठी हा नवा अवतार सुबोधने घेतला की काय अशी शंका हा फोटो पाहिल्याने उपस्थित होतो. तसेच या फोटोवर अनेक मजेशीर कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी त्याला दिले आहेत.