घरमनोरंजनशिट्या, टाळ्यांच्या कडकडाटात ‘लाल्या’ पुन्हा रंगभूमीवर

शिट्या, टाळ्यांच्या कडकडाटात ‘लाल्या’ पुन्हा रंगभूमीवर

Subscribe

अभिनेता सुबोध भावेने ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाची घोषणा केली आणि प्रेक्षकांना कधी एकदा नाटक रंगभूमीवर येत आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. अर्थात अश्रूंची झाली फुले या नाटकात सुबोध स्वत: काम करत असल्यामुळे लाल्याच्या मुख्य भूमिकेत सुबोध भावे दिसणार यात शंकाच नव्हती. अखेर तो दिवस उजाडला. अश्रूंची झाली फुले या नाटकाचा पहिला प्रयोग नाशिकमध्ये पार पडला आणि नाटकाला पहिली ‘हाऊसफुल’ची पाटी लागली.

अभिनेता सुबोध भावेचा ‘आणि काशिनाथ घाणेकर’ सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. सुबोधनं साकारलेले अभिनेते काशिनाथ घाणेकर अनेक प्रेक्षकांना आवडले होते. त्या सिनेमातून घाणेकरांच्या नाटक, सिनेमातल्या व्यक्तिरेखा सुबोधच्या रूपानं पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनाही आनंद झाला. या नाटकाचे केवळ ५१ प्रयोग होणार आहेत. 1966मध्ये प्रभाकर पणशीकरांनी हे नाटक पहिल्यांदा रंगमंचावर आणलं होतं. त्यानंतर त्याचे 1111 प्रयोग केले होते. काही वर्षांपूर्वी पुन्हा हे अजरामर नाटक रंगमंचावर आलं. त्यावेळी रमेश भाटकरांनी लाल्याची भूमिका केली होती. रमेश भाटकरांनी साकारलेला लाल्याही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता.

- Advertisement -

आणि काशिनाथ घाणेकर सिनेमानं जुना काळ जिवंत केला होता. या चित्रपटातून नवीन पिढीनेही लाल्याला आपलसं केलं. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुबोध भावे एकदा म्हणाला होता. नुसत्या काशीनाथ घाणेकरांच्या नावावर नाटक हाऊसफुल होत असे. मला असा अनुभव कधीच आलेला नाही.’‘पण अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला नाशिककरांनी दिलेला उदंड प्रतिसाद बघता हा अनुभव सुबोध भावे यांनीही नक्कीच घेतला असणार. या नाटकाद्वारे सुबोध भावे जवळपास सहा वर्षांनंतर रंगभूमीवर काम करणार आहे.

या नाटकाचं दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केलं आहे. नाटकात सुबोध भावे यांच्याबरोबर शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप यांच्याही भूमिका आहेत. आता सुबोधनं साकारलेल्या लाल्याचा आवाज महाराष्ट्रभर घुमणार आहे. लाल्याचं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -