घरमनोरंजनसुबोध भावेच्या अभिनेत्रीची 'ही' स्टोरी तुम्हाला माहितीये का?

सुबोध भावेच्या अभिनेत्रीची ‘ही’ स्टोरी तुम्हाला माहितीये का?

Subscribe

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय.मालिकेतील ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांनाच भावली आहे. सुबोध भावेने ईशाबद्दल एक खास पोस्ट सोशलमिडीयावर शेअर केली आहे.

‘झी मराठी’वरील नवीनच सुरू झालेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत आहेत. गायत्री साकारत असेलली इशा प्रेक्षकांना खूपच भावली आहे.

सुबोध भावेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुबोध बरोबर एक लहान मुलगी दिसत आहे. ती मुलगी म्हणजे या मालिकेत सुबोध बरोबर काम करणारी इशा म्हणजेच गायत्री दातार आहे. हा फोटो शेअर करताना सुबोधने एक कॅप्शन लिहीलं आहे, ‘दुनिया गोल है’ काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली होती की ‘मला पण तुमच्याबरोबर काम करायचं’, मी म्हणालो नक्की आणि अचानक एक दिवशी ‘तुला पाहते रे’च्या सेटवर  तिची गाठ पडली आणि तिने मला या प्रसंगाची आठवण करून दिली. ती मुलगी म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती इशा म्हणजेच गायत्री दातार. स्वप्नांवरचा माझा विश्वास अजून वाढला आहे.’

 

View this post on Instagram

 

“दुनिया गोल हैं” काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली की मला पण तुमच्या बरोबर काम करायचं मी म्हणालो नक्की आणि अचानक एक दिवशी “तुला पाहते रे ” च्या सेट वर तिची गाठ पडली. आणि तिनी मला ह्या प्रसंगाची आठवण करून दिली . मी थक्क!!!!!!! ती मुलगी म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती “इशा” म्हणजेच “गायत्री दातार” स्वप्नांवरचा माझा विश्वास अजूनच वाढला. #तुलापहातेरे सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त @zeemarathiofficial वर @_gayatridatar_ Atul Ketkar Aparna Ketkar Girish Mohite

A post shared by subodh (@subodhbhave) on

- Advertisement -

‘तुला पाहते रे’ या मालिकेतील ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांनाच भावली आहे. विक्रम सरंजामे हा शहरातील एक मोठा बिझनेसमन आहे. खूप श्रीमंत, अलिशान घर असलेला विक्रम. तर चाळीत राहणारी, मध्यमवर्गीय कुटूंबातील इशा निमकर. या दोघांमध्ये मैत्री होते आणि त्याचे रूपांतर प्रेमात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -