Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरी मागता का?'; सुबोध भावेचा आगळावेगळा प्रश्न

‘तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरी मागता का?’; सुबोध भावेचा आगळावेगळा प्रश्न

Subscribe

याच कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान सुबोध भावेचे भन्नाट प्रश्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

सध्या महाराष्ट्रात एका भन्नाट कार्यक्रमाची चर्चा सुरु आहे. ‘मी घेऊन आलो आहे महिलांसाठी खास राखीव बस’ अभिनेता सुबोध भावेचं(subodh bhave) हे वाक्य सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना ‘बस बाई बस’ या नव्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे. हा कार्यक्रम २९ जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करणार आहे त्याचसोबत या कार्यक्रमात काही महिला कलाकारही सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान सुबोध भावेचे भन्नाट प्रश्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

हे ही वाचा – लेडीज स्पेशल बस, सुबोध भावेचा नवा कार्यक्रम लवकरच

- Advertisement -

जसं की, ‘हॉटेलमधून साबण किंवा शाम्पू घरी घेऊन जात का?, पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरी मागता का? या अश्या भन्नाट प्रश्नांना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमाला सोशल मीडियावरच एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे मग कार्यक्रम प्रसारित झाल्यावर त्याला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.

हे ही वाचा –  ‘मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर, ‘कट्यार काळजात घुसलीनंतर’ दिग्दर्शक सुबोध भावेचा नवा संगीतमय चित्रपट

- Advertisement -

सुबोध भावे त्याच्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओतून काम करतो. त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता सुबोध भावे महिलांसाठी विशेष बस घेऊन येणार आहे. सुबोध भावेचा ‘बस बाई बस'(bus bai bus) हा कार्यक्रम एकदम हटके असणार आहे. त्यामुळे महिला प्रेक्षक वर्गामध्ये या कार्यक्रमाची क्रेझ दिसते आहे. या कार्यक्रमाचा टिझर आऊट झाल्यापासून हा कार्यक्रम नक्की कसा असणार याविषयी अधिक उत्सुकता वाढली आहे. या कार्यक्रमात मजा, मस्ती आणि धमाल असणार आहे यात शंकाच नाही. दरम्यान या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी प्रेकक्षसुद्धा उत्सुक आहेत.

हे ही वाचा –  वाढदिवसानिमित्त सुबोध भावेंची चाहत्यांना खास भेट ; ‘फुलराणी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -