‘अशा पागल लोकांना…’ काली प्रकरणावर विवेक अग्निहोत्रींनी साधला लीना मणिमेकलाईवर निशाणा

बहुचर्चित 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या प्रकरणार आपली प्रतिक्रिया मांडली आहे

मागील अनेक दिवसांपासून दिग्दर्शक लीना मणिमेकलाईच्या ‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरने भारतात वाद निर्माण केलेला आहे. हा काली विवाद आता हळूहळू वाढतच आहे. लीना मणिमेकलाई विरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर दिल्लीतील एका कोर्टामधून लीना मणिमेकलाईला समन्स देखील बजावला असून लीना मणिमेकलाईला ६ ऑगस्ट रोजी कोर्टात उपस्थित राहावं लागणर आहे. सोबतच आपली बाजू मांडण्याची संधी सुद्धा लीना मणिमेकलाईला देण्यात येणार आहे. दरम्यान, यासर्व प्रकरणार अनेकजण आपल्या प्रतिक्रिया मांडत आहे.

राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच आता बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे. त्यात ते म्हणाले की, ‘कोणी अशा पागल लोकांना संपवू शकता का?’

खरंतर विवेक अग्निहोत्री यांनी हे ट्वीट लीना मणिमेकलाईच्या एका ट्वीटवर केलं आहे, ज्यात तिने लिहिलं होतं की, “माझी काली विचित्र आहे, ती एक स्वतंत्र आत्मा आहे. ती पितृसत्तेचा धिक्कार करते, ती हिंदुत्वाला संपवते. ती साठवण नष्ट करते, ती आपल्या हजार हातांनी सगळ्यांना जवळ घेते.” लीनाने देवी कालीच्या पोस्टरमध्ये ती सिगारेट ओढताना दाखवले होते. शिवाय तिच्या हातामध्ये एलजीबीटीक्यूचा झेंडा सुद्धा आहे. त्यामुळे भारतात लीना विरोधात संतापाची लाट उसळत आहे.

दरम्यान, सध्या या पोस्टरवरून लीना मणिकलाईवर अनेक टिका केल्या जात आहेत. तसेच तिला अटक करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. दिल्ली आणि यूपीमध्ये तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा :जय माँ कलकत्ते वाली,तेरा श्राप ना जाये खाली…, काली प्रकरणादरम्यान अनुपम खेर यांचं ट्वीट चर्चेत