Monday, May 3, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सुगंधा मिश्राने शेअर केले लग्नातील खास क्षणाचे फोटो,चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

सुगंधा मिश्राने शेअर केले लग्नातील खास क्षणाचे फोटो,चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

२६ एप्रिल रोजी सुगंधा श्रर्मा आणि संकेत भोसले दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकतच सुगंधाने आपल्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

Related Story

- Advertisement -

लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ मधील सर्वच कलाकारांना अल्पवधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या कार्यक्रमात पाहायला मिळालेला अभिनेता संकेत भोसले आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा या दोन कलाकारांच्या रिलेशनशिपबद्दल बऱ्याचदिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र काही काळाने या दोघांनीही आपले नाते जगजाहिर केले होते. इन्स्टाग्रामवर हे दोघे त्यांचे रोमॅन्टिक फोटो शेअर करायचे. आता दोघही विवाह बंधनाथ अडकली आहेत. २६ एप्रिल रोजी सुगंधा श्रर्मा आणि संकेत भोसले दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकतच सुगंधाने आपल्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  या फोटो मध्ये सुगंधा अतिशय सुंदर दिसत असून तिने फिक्कट क्रीम रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच त्याच सोबत गुलाबी रंगाचा दुपट्टा घेतला आहे. संकेतने फिक्कट हिरव्या रंगाच्या शेरवाणी वर क्रीम कलरचा फेटा घातला आहे. एकमेकांच्या गळ्यात हार घालतांना चा फोटो सुगंधा ने शेअर करत ”Aur isee ke sath … “Your Life ,My Rules” आणि दर्शनला टॅग करत फोटोला एक मजेशीर कॅप्शन लिहालं आहे.अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी  आनंद व्यक्त करत दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

पंजाबमधील जालंधर येथे यांचा लग्नसोहळा पार पडला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खाजगी पद्धतीने हा विवाहसोहळा उरकण्यात आला. तसेच लग्न आणि साखरपुडा एकाच दिवशी करण्यात आलं. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार व्हावे याची काळजी संकेत भोसले याने घेतली होती.संकेत भोसले ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात संजय दत्त ची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करायचा तर सुगंधा मिश्रा अनेक भूमिकांमध्ये समोर आली होती. संकेत यापूर्वी ‘बाबा की चौकी’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसला होता. तसेच सुनिल ग्रोवर यांच्या ‘गॅंग्स ऑफ फिल्मिस्तान’ मध्येही पाहायला मिळाला होता.

 


- Advertisement -

हे हि वाचा – पतीच्या निधनानंतर मयुरीने घेतलेल्या निर्णयासाठी चाहत्यांकडून होतंय कौतुक

- Advertisement -