Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सुगंधा मिश्राचा अस्सल मराठमोळा थाट, महाराष्ट्रीयन पेहरावाने जिंकली मन

सुगंधा मिश्राचा अस्सल मराठमोळा थाट, महाराष्ट्रीयन पेहरावाने जिंकली मन

६ एप्रिल रोजी सुगंधा श्रर्मा आणि संकेत भोसले दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकतच सुगंधाने आपल्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

Related Story

- Advertisement -

कॉमेडीचा बादशाह संकेत भोसले आणि कॉमेडी क्वीन सुगंधा मिश्रा यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. २६ एप्रिल रोजी सुगंधा श्रर्मा आणि संकेत भोसले दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकतच सुगंधाने आपल्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. लग्नझाल्यानंतर सुगंधाने मराठमोळ्या अंदाजात पेहराव करून घरामध्ये  दाखल झाली आहे. सुगंधाने सोशल मीडिया अकाऊंटवर लग्ननंतरच्या विधीचे काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुगंधाच्या नथ,गजरा आणि नऊवारी साडी मधला अवतार चहत्याच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तसेच संकेतने कुर्ता आणि पायजमा घातला आहे. सुगंधाने फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहल आहे की,”एवढ्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद”

- Advertisement -

लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ मधून या दोघांकलाकारांना अल्पवधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.तसेच अभिनेता संकेत भोसले आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा या दोन कलाकारांच्या रिलेशनशिपबद्दल बऱ्याचदिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र काही काळाने या दोघांनीही आपले नाते जगजाहिर केले होते. इन्स्टाग्रामवर हे दोघे त्यांचे रोमॅन्टिक फोटो शेअर करायचे. आता दोघही विवाह बंधनाथ अडकली आहेत. पंजाबमधील जालंधर येथे यांचा लग्नसोहळा पार पडला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खाजगी पद्धतीने हा विवाहसोहळा उरकण्यात आला. तसेच लग्न आणि साखरपुडा एकाच दिवशी करण्यात आलं. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार व्हावे याची काळजी संकेत भोसले याने घेतली होती.संकेत भोसले ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात संजय दत्त ची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करायचा तर सुगंधा मिश्रा अनेक भूमिकांमध्ये समोर आली होती. संकेत यापूर्वी ‘बाबा की चौकी’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसला होता. तसेच सुनिल ग्रोवर यांच्या ‘गॅंग्स ऑफ फिल्मिस्तान’ मध्येही पाहायला मिळाला होता.


हे हि वाचा – Coronavirus: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोरोनाची लागण

- Advertisement -