घरमनोरंजनसुहानाच्या मिरर सेल्फीवर होतेय चर्चा

सुहानाच्या मिरर सेल्फीवर होतेय चर्चा

Subscribe

नेहमीप्रमाणेच सुहानाचा आणखीन एका सेल्फीवर सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडपासून दूर असली तरी तिच्या सोशल मिडीयावरील सहभागामुळे ती सतत चर्चेत राहिली आहे. वडीलांप्रमाणेच अगदी कमी कालावधीत सुहानाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. सुहाना खानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील छायाचित्रांची नेहमीच चर्चा होते.

नुकताच सुहानाने मिरर सेल्फीचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यावेळी सुहानाचा हा सेल्फी वेगळ्याच कारणासाठी चर्चेचा विषय ठरत आहे. झाले असे की, सुहानाने नुकताच तिचा इन्स्टाग्रामचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. सुहानाने प्रोफाइलवर मिरर सेल्फी ठेवला आहे. यामध्ये सुहानाने बिनबाह्यांचा ड्रेस घातला असून फारच कमी आभूषणे घातली आहेत. या फोटोमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. मात्र असे असले तरी सुहानाच्या या मिरर सेल्फीमुळे तिच्या चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

- Advertisement -

काय आहे चर्चा

मिरर सेल्फीमध्ये सुहानाच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये दिसणाऱ्या तिच्या एटीएम कार्ड्सनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या एटीएम कार्ड्सवर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सुहानाच्या या वायरल झालेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केले आहेत. एका युजरने तर कमेंट करताना म्हटले आहे की, वो कार्ड मुझे दे दे ठाकूर. तर दुसऱ्या युजरने सुहानाच्या या फोटोवर काहीशी गंभीर प्रतिक्रीया दिली आहे. त्याने प्रतिक्रियेत म्हटले की, नेहमीच्या खर्चासाठी या एटीएम कार्ड्समध्ये नक्कीच कोटी रूपये असतील. नशीबवान मुलगी. तर काहींना सुहानाची मोबाईल कव्हरमागे एटीएम कार्ड्स ठेवण्याची सवय स्वतःप्रमाणेच म्हणजे सर्वसामान्यांप्रमाणेच वाटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -