मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार मंडळी सध्या लग्नबंधनात अडकले आहेत. नुकताच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि ‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगांवकरचा विवाहसोहळा थाटात पार पडला. शिवाय येत्या महिन्यात सिद्धार्थ खिरीड, अक्षय केळकरसारखे बरेच कलाकार लग्न करणार आहेत. अशातच आणखी एका अभिनेत्रीचा शुभविवाह झाल्याचे समजत आहे. ‘एका पेक्षा एक’ या डान्सिंग रिऍलिटी शोमधून नावारूपाला आलेली सुकन्या काळण नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Sukanya Kalan tied wedding knot with her boyfriend Roshan)
सुकन्या अडकली लग्नबंधनात
सचिन पिळगांवकरांच्या ‘एका पेक्षा एक’ या डान्सिंग रिअॅलिटी शोमधून सुकन्या काळण नावारुपाला आली. या शो दरम्यान सुकन्या ही महागुरुंची अत्यंत लाडकी स्पर्धक होती. शोनंतर पुढे तिने अभिनय क्षेत्राकडे वाटचाल केली आणि अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली.
View this post on Instagram
आता वैयक्तिक आयुष्यात सुकन्याने नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. नुकताच तिचा विवाहसोहळा अगदी थाटात पार पडला. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत सुकन्याने तिचा बॉयफ्रेंडसोबत रोशनसोबत लग्न केले.
मराठी आणि साऊथ पद्धतीने लग्न
सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ‘शाळेच्या वर्गातील हास्यापासून ते आयुष्यभराच्या आश्वासनांपर्यंत, आमची प्रेमकहाणी बालपणात सुरू झाली आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासह ती अधिकच दृढ होत गेली’, असे कॅप्शन देत तिने सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा मेहंदी, संगीत आणि हळद सोहळ्यातील क्षण पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
मुख्य म्हणजे, सुकन्याने मराठमोळ्या पध्दतीसह दाक्षिणात्य पद्धतीनेदेखील लग्न केले आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओत या दोन्ही पद्धतीच्या विवाह सोहळ्यातील क्षण पहायला मिळत आहेत. यासोबत ‘कन्याहुईरोशन’ हा हॅशटॅग सुपर व्हायरल होताना दिसतोय.
View this post on Instagram
सुकन्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, अलीकडेच ती ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात दिसली होती. शिवाय लावणीकिंग आशिष पाटीलसोबत तिने ‘सुंदरी’ हा डान्स शो केला. यानंतर आता लवकरच ती ‘द दमयंती दामले’ या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
हेही पहा –
Vicky Kaushal : छावाच्या यशानंतर विकीने घेतलं बाबुलनाथाचे दर्शन