घरताज्या घडामोडीजान्हवी, सारा यांनाही सुकेशने दिले होते गिफ्ट ; ED च्या चार्जशीटमध्ये खुलासा

जान्हवी, सारा यांनाही सुकेशने दिले होते गिफ्ट ; ED च्या चार्जशीटमध्ये खुलासा

Subscribe

सुकेश चंद्रशेखरने या तिन्ही अभिनेत्रींना महागडी गिफ्ट फाठवले होते. रिपोर्टनुसार, जान्हवी कपूरला १८ लाखांचे महागडे गिफ्ट पाठवण्यात आले होते.

२०० करोडच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरची कसून चौकशी सुरू आहे. सुकेश सध्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. अभिनेत्री मॉडेल जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीला महागडे गिफ्ट देणाऱ्या सुकेशच्या यादीत आता अभिनेत्री जान्हवी कपूर, सारा अली खान, भूमी पेडणेकर यांची नावे देखील आली आहेत. ईडीने फाइल केलेल्या चार्जशीटमध्ये हा नवा खुलासा झाला आहे. सुकेश चंद्रशेखरने या तिन्ही अभिनेत्रींना महागडी गिफ्ट फाठवले होते. रिपोर्टनुसार, जान्हवी कपूरला १८ लाखांचे महागडे गिफ्ट पाठवण्यात आले होते.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जान्हवीच्या जवळच्या मैत्रिणीने म्हटले आहे की, जान्हवीचे सुकेशसोबत काही कॉन्टॅक्ट नव्हता. सुकेशने त्याची पत्नी लीना मारियाच्या माध्यमातून जान्हवीला अप्रोच केले होते. लीना मारिया पॉनने एका सलोनची मालकीण म्हणून जान्हवीशी संपर्क केला होता. १९ जुलै २०२१ला बंगळूरूमध्ये एका सलोनच्या ओपनिंगसाठी जान्हवीला आमंत्रण दिले होते. जान्हवीला यासाठी १८.९४ लाख रुपये प्रोफेशनल फीस थेट जान्हवीच्या अकाऊंटला ट्रान्सफर केली होती. जान्हवीने ईडीला दिलेल्या माहितीनुसार, लीनाच्या आईने जान्हवीला एक क्रिश्चियन डियॉरची टोट बॅग गिफ्ट दिली होती. जान्हवी तिचे संपूर्ण बँक डिटेल्स ईडीला सुपूर्त केले आहेत.

- Advertisement -

सुकेशची साथीदार असलेल्या ईराणीच्या चौकशीत असे समोर आले की, पिंकी इराणी ही सुकेशच्या विश्वासातील सल्लागार होती. अभिनेत्री भूमी पेडणेकरला देखील सुकेशने अप्रोच केले होते. भूमीने ईडीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, ईराणीने तिला एचआर न्यूज एक्सप्रेस पोस्टची उपाध्यक्ष म्हणून मेसेज केला. तिने सांगितले त्यांचा लीडर म्हणजेच सुकेश चंद्रशेखर तिचा मोठा फॅन आहे. आणि त्यांना तुमच्याशी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे आहे आणि त्यांना तुम्हाला एक कारही गिफ्ट करायची आहे.

तर अभिनेत्री सारा अली खानने ईडीला सांगितले की, तिला पिंकी ईराणीकडून कोणतेही गिफ्ट्स आले नाहीत. त्यांनी कोणताही वैयक्तिक संवाद साधला नाही. सुकेश चंद्रशेखर किंवा शेखर अशा कोणत्याच व्यक्तिला ती ओळखत नाही. परंतु मे २०२१मध्ये तिला श्री सूरज रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने व्हॉट्स अँप केला होता. आणि त्याला मला कार गिफ्ट करायची होती. त्यासाठी मी ईराणीशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले होते. तो मला भेटवस्तू देण्यासाठी आग्रह करत होता मात्र मी त्याला वेळोवेळी नकार दिला. तरीही त्याने मला चॉकलेट बॉक्स घेण्यासाठी संमती मागितली आणि त्यानंतर चॉकलेट फ्रँक मुलरचे घड्याळ पाठवले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘माझे नाव गुगल करण्यासाठी…’ प्रियंका चोप्राची Rosie O’Donnell च्या माफीवर प्रतिक्रिया, काय आहे प्रकरण ?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -