मनी लाँड्रिंग प्रकरणातून अभिनेत्री जॅकलीनला दिलासा; अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवला

patiala house court to decide on actress jacqueline fernandez bail bail today

सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा दिला आहे. न्यायालयाने जॅकलिनची अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता जॅकलिन तिच्या वकिलांसह न्यायालयात पोहोचली. गेल्या सुनावणीतही न्यायालयाने तिचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.

सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पतियाळा हाऊस कोर्टाने 26 सप्टेंबर रोजी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 50,000 रुपयांच्या जामीनावर अंतरिम जामीन मंजूर केला होता.

सुकेशने जॅकलीनला महागड्या कार आणि महागड्या गिफ्ट्स दिले होते. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनाही त्यांने कार भेट दिली. पिंकीने सुकेशची जॅकलिनशी ओळख करून दिली होती. त्या दोघांच्या जाळ्यात ती पूर्णपणे फसली होती आणि तिने लग्न करण्याचेही ठरवले होते.

मुंबईत राहणारी पिंकी इराणी हिला सुकेशने आपला एजंट म्हणून बोलवायचा आणि तिच्यामार्फत तो मनमोहक मॉडेलिंग करणाऱ्या मुलींनाही जेलमध्ये बोलावून खोलीत भेटायचा. भेटल्यानंतर तो सर्वांना महागड्या भेटवस्तूही भेट देत होता.


अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याकरता निविदा जारी, बांधकाम विभागाने वेळही केली निश्चित