सुकेशने दिल्या जॅकलीन फर्नांडिसला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा

खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर 200 कोटींच्या खंडणी वसूल केल्याच्या आरोपाप्रकरणी मागील काही महिन्यांपासून दिल्लीच्या मंडोली तुरुंगात आहे. सुकेशचे बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध असल्याचं सत्य काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेट वस्तू देऊन भूरळ पाडली होती. दरम्यान, अशातच सुकेशचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मंगळवारी सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुकेशला दिल्लीतील कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी तिथल्या पत्रकारांनी त्याला जॅकलीनबाबत काही प्रश्न विचारले. यावर सुकेश पत्रकारांना म्हणाला की, “जॅकलीनला माझ्याकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा द्या”. असं सुकेश म्हणाला.

पुढे पत्रकारांनी जॅकलीनने त्याच्यावर केलेल्या आरोपांबाबत काही प्रश्न विचारले त्यावेळी तो म्हणाला की, “मला यावर काहीच बोलायचे नाही. यामागे नक्कीच तिचे काही कारण असेल. ज्यावेळी तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचे संरक्षण करता.”

बॉलिवूड अभिनेत्रींना भेट दिली गिफ्ट

सुकेशने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना महागड्या भेट वस्तू देऊन भूरळ पाडली होती. यात जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही, श्रद्धा कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर यांसारख्या अनेकींच्या नावाचा सहभाग आहे. सुकेशने जॅकलीन फर्नांडिसला 52 लाखाचा घोडा आणि 9 लाखांची पर्शियन मांजर देखील भेट दिली होती.

 


हेही वाचा :

‘मास्टरशेफ इंडिया’ मधील ‘ठेचा क्वीन’ सुवर्णा बागुल यांचा होम शेफ ते मास्टर शेफ प्रवास