घरमनोरंजनगौतम बुद्धांचा अवमान, महेश कोठारेंनी मागितली जाहीर माफी

गौतम बुद्धांचा अवमान, महेश कोठारेंनी मागितली जाहीर माफी

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. मात्र महेश कोठारे यांचे माफी मागण्यामागचे नेमके कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. महेश कोठारे निर्मित ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील एका एपिसोडमध्ये स्त्री पात्राने परिधान केलेल्या कपड्यांवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या कपड्यांवरून मालिकेवर टीका केली आहे. यानंतर महेश कोठारे यांनी जाहीर माफी मागितली आहे.

१४ सप्टेंबर रोजी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील सँडी या पात्राने ब्लाऊजवर गौतम बुद्धांचे चित्र दाखवण्यात आले होते. या चित्रामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर मालिकेवर विविध आरोप करत संपात व्यक्त केला. यानंतर महेश कोठारे यांनी एक व्हिडिओ शेअर करत जाहीर माफी मागितली. महेश कोठारे म्हणाले की, ‘मित्रांनो जी स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी आमची मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या १४ सप्टेंबरच्या भागात आमच्या एका पात्राच्या ब्लाऊजवर वंदनीय गौतम बुद्ध यांचे चित्र होते. या घटनेमुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मी आणि माझी संपूर्ण टीम गौतम बुद्ध यांचा खूप आदर करते. ही चूक कोणीही मुद्दाम केलेली नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. पण या चुकी बद्दल मी तुमची जाहीर माफी मागतो. अगदी मनापासून माफी मागतो. माझ्या यूनिट तर्फे, टीम तर्फे, आमच्या कलाकारांतर्फे सर्वांतर्फे मी आपली मनापासून माफी मागतो. तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा व्यक्त करतो.’

- Advertisement -

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरली आहे. या मालिकेने आजवर हजारो प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत गौरी आणि जयदीप यांची अनपेक्षित प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका मालिकेत दाखवण्यात आली आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -