घरमनोरंजन"सुखी" संसाराचा कानमंत्र

“सुखी” संसाराचा कानमंत्र

Subscribe

-हर्षदा वेदपाठक

तरुणपणाच्या उतरणीवर असलेल्या आईची कहाणी, जी स्वतःला एकटी मानते, मेट्रो सिटी मध्ये घडणारं हे वास्तवदर्शी कथानक आहे. दिग्दर्शिका सोनल जोशी हि महिला असल्यामुळे, बाई..बायको..आईं यांचा एकटेपणा काय असतो, ते ती व्यवस्थित समजू शकते. आणि ते तिचे बाईपण समजणे तिने सुखी या चित्रपटामध्ये चपखलरित्या मांडले आहे. जे प्रत्येक महिलेला आपलेसे वाटेल. अश्या कथानकाला जेव्हा एखादी स्टार अभिनेत्री निभावते, ती भट्टी काही औरच जमते, असेच काहीसे सुखी या चित्रपटबद्दल घडते.

- Advertisement -

कॉलेज मध्ये बेधडक आयुष्य जगणारी सुखप्रीत, लग्न झाल्यावर, बायको – आई म्हणून वागताना स्वतःला एकदम विसरून जाते. कॉलेजचे रीयुनियन आहे, तिकडे जुन्या मैत्रीण भेटतील, जुन्या आठवणी जागवू, या विचाराने, तिला रीयुनियनला जायची इच्छा असते. परंतु नवऱ्याचा व्यवसाय…मुलीची परीक्षा यात वेळ कसा काढायचा कसा हा प्रश्न तिला पडतो. आपली नातसुन आपल्या इच्छा मारून, सगळ्यांसाठी सतत राबते, हे पाहून सुखीचे आजे सासरे तिला दिल्लीला रेऊनियन्साठी पाठवण्याची सोय करतात..त्यानंतर सुखी स्वतःला कसे शोधते त्याचे चित्रण सुखी या चित्रपटामध्ये आहे. गृहिणी म्हणून जगताना, आई आणि बायको म्हणून आत्मसन्मान असतो, हे ती शोधते. सुखी आपल्याला भिडते ते संवादमुळे. खास करून, शिल्पाच्या वाट्याला आलेले संवाद दिलखेच आहेत.

दिग्दर्शिका सोनल जोशी हिची सुखी हि कथा कोणत्यातरी सास बहु मलिकेबरोबर जुळत असली तरी, ती तसे होवू देत नाही. अगदी दृश्य आणि संवाद निवडताना सुद्धा ती चित्रपट करत आहे हे लक्षात ठेवते. त्यामुळे तो पाहताना आपण मालिका पाहत आहोत असे वाटत नाही, हे विशेष. अनेक दृश्य हि लांबलचक आहेत, तेवढे मात्र खटकते.

- Advertisement -

लग्न झाल्यावर एक मुलगी आपल्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न हे विसरून दुसऱ्याच्या घरात बायको, सुन म्हणून प्रवेश करते. नंतर ती जेव्हा आई होते तेव्हा तर ती स्वतःला मागे ठेवून फक्त कुटुंब या एकमेव शब्दाभोवती तिची स्वप्न फिरत राहतात. परंतु जेव्हा तिला आपल्या स्वप्नांची आठवण येते, तेव्हा ती कशाप्रकारे प्रतिकार करते, हे कथानक प्रत्येक गृहिणीचे आहे. ते विविध कांगोऱ्यामध्ये उलगडताना शिल्पा शेट्टी भाव खावून जाते. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच सशक्त व्यक्तीरेखा निभावल्याचे पाहायला मिळते. यात तिला त्याचे सह कलाकार चैतन्य चौधरी, अमित साथ आणि इतर उत्तम साथ देतात.

दिल्ली आणि पंजाब मधील दृश्य दाखवताना तेथील बारकावे नेपथ्यकाराने उत्तम प्रकारे साकारले आहेत. सिनेमॅटोग्राफ्री प्रसंगानुरू घडताना दिसते.

सुखी चे कथानक हे पंजाबी पार्श्वभूमीवर आधारित असल्यामुळे, चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि संगीत लाऊड आहे. मात्र त्यात श्रवणीयता अजिबात नाही.

सुकी हा चित्रपट घरच्या कामकाजामध्ये, कुटुंबामध्ये स्वतःला हरवून बसलेल्या गृहिणीसाठी जितका महत्त्वाचा आहे. तितकाच तो गर्लफ्रेंड असल्यावर तरुणीला अति महत्व देणाऱ्या तिची आवड निवड, तिचा मान सन्मान जपणाऱ्या. मात्र पुढे ती तरुणी जेव्हा बायको होते. तेव्हा तिचे गर्लफ्रेंड असतानाचे ते सगळे गुण विसरून जाणाऱ्या नवऱ्या वर्गासाठी देखील महत्त्वाची आहे. एकदा का गर्लफ्रेंड-बायको झाली म्हणजे, ती अडगळीतच जाते हि विचारधारा असलेल्या पुरुषांसाठी सुखी हा चित्रपट दिशादर्शक मानायला पाहिजे. इतकेच नव्हे तर, घरामध्ये स्वतःची काम अजिबात न करणाऱ्या शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला मुलींसाठी देखील हा चित्रपट महत्त्वाचा आहे. कारण ते आईला आई कमी आणि आया बनवून ठेवतात. मात्र ती त्यांची आई असण्यापूर्वी एक व्यक्ती देखील आहे. यावर सुखी हा चित्रपट प्रकाश टाकतो. एकंदरीत, समस्त कुटुंबाने एकत्रित बसून पहावा असा हा सुखी चित्रपट आहे. आणि त्यातून बोध घेऊन घरातले नातेसंबंध सुधारता येऊ शकतील, याची जाण करून देणारा असा हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही.


हेही वाचा- Movie Review : मानवतेची शिकवण देणारा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -