Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सुमित पाटीलच्या मीम्सची झाली चोरी, लोगो हटवून सुमितचे मीम्स केले व्हायरल !

सुमित पाटीलच्या मीम्सची झाली चोरी, लोगो हटवून सुमितचे मीम्स केले व्हायरल !

सुमित सध्या भाडिपामध्ये काम करत असून कोथरुड वर्सेस कोल्हापूर या नव्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये भन्नाट अभिनय करताना दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

सध्या जगभरामध्ये इंटनेटचं(internet) जाळ इतकं पसरलं आहे की दररोज सोशल मीडियावर (social media)काही ट्रेन्ड होतं. किंवा कधी काय व्हायरल(viral) होईल याचा पत्ता नाही. दरम्यान काही वर्षांपासून मीम(meme) नावाचा प्रकार भन्नाट गाजत आहे. या मीम्सद्वारे अनेकांना ट्रोलही केलं जात तर मनोरंजनाचा नवा पर्याय म्हणून मीम्स सगळीकडे तुफान लोकप्रिय होत आहे. दररोज असंख्य मीम्स(viral meme) व्हायरल होतात. मात्र यापैकी आपल्याला काही आवडेले मीम्स आपण स्टेटस किंवा इतर ग्रुपमध्ये शेअर करतो. पण हे मीम्स तयार करण्यासाठी मीम्सटर्स(memester) प्रचंड मेहनत करावी लागते. यापैकी अनेकांना तर त्यांच क्रेडिट देखील मिळत नाही. यामुळे मीम्सची चोरी होते. तुम्ही विचार कराल मीम्सची चोरी हा काय प्रकार आहे?. मीम्सची चोरी नेमकी कशी होते हे आपण मराठी मधील लोकप्रिय मीमस्टर सुमित पाटीलकडूनच (sumit patil)जाणून घेऊयात.(marathi memer sumit patil)

अगदी सुरूवातीच्या काळात मीम्स हा प्रकार फारसा कुणाला ठाऊक नव्हता. यामुळे मी मीम्ससोबत डबिंग करायचो आणि ते हळूहळू लोकांच्या पसंतीस पडले. सर्वात आधी टायटॅनिक सिनेमातील कलाकारांवर एक डबिंग केलं होतं. या डबिंग मध्ये मुख्य कलाकार कोल्हापुरी मिसळसंबधीत संवाद करत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र या व्हिडिओमध्ये फक्त माझा लोगो आणि आवाज असल्यामुळे हा व्हिडिओ मी केलाय हे स्पष्ट होत नव्हतं. आणि याचाच फायदा घेऊन अनेकांनी लोगो हटवून तो मीम व्हायरल केला. तसेच लोगो दिसू नये म्हणून त्याला ब्लर करुन व्हायरल करायचे. इतकंच नाही तर बऱ्याचदा माझ्या व्हिडिओची चोरी झाली आहे. मी इतकी मेहनत घेऊनही मला याच क्रेडीट मिळत नसे. मात्र यानंतर मी स्वत: स्क्रीनवर दिसायला लागलो मुळात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मला अभिनय करणं भाग पडलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by sumit patil (@sumit.patil942)

- Advertisement -

सुमित सध्या भाडिपामध्ये (Bhadipa)काम करत असून कोथरुड वर्सेस कोल्हापूर या नव्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये भन्नाट अभिनय करताना दिसत आहे. पहिल्यांदाच अभिनय करणारा सुमित एक उत्तम मिमस्टर आहे तसेच त्याचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.


- Advertisement -

हे हि वाचा –राधिका आपटे आहे विवाहित, तरीही राहते Long Distance Relationship मध्ये

- Advertisement -