घरमनोरंजनआरेतील कारशेडला सुमीत राघवनचा पाठिंबा; पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप

आरेतील कारशेडला सुमीत राघवनचा पाठिंबा; पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप

Subscribe

या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रविवारी ३ जुलै रोजी सकाळी मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी आणि विविध सामाजिक संस्था आंदोलनासाठी आरे येथे सहभागी होणार आहेत

नव्या सरकारचे आगमन होताच ‘मेट्रो ३’ साठीचे कारशेड आरे येथेच होणार असल्याचा निर्णय नव्या सरकारकडून घेण्यात आला. मात्र नव्या सरकारच्या या निर्णयाला पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रविवारी ३ जुलै रोजी सकाळी मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी आणि विविध सामाजिक संस्था आंदोलनासाठी आरे येथे सहभागी होणार आहेत. यापूर्वी देखील अनेकांनी याचा विरोध केला होता. यामध्ये अनेक कलाकारांपासून ते सामान्यांचा देखील सहभाग होता. मात्र आता यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत अभिनेता सुमीत राघववने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुमीत राघवनने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. हा
स्क्रीनशॉर्ट कुर्ला की आवाज या पेजचा आहे. यामध्ये “आरेचं जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी एकत्र या. ३ जुलै रविवारी ११ वाजता पिकनीक पॉइंट, आरे , असे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.”

- Advertisement -

हा स्क्रिनशॉर्ट शेअर करत सुमीतने लिहिलंय की, “एक वेगळा आवाज ऐका. मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. आम्हाला मुंबई ‘मेट्रो ३’ ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे. राहिला मुद्दा कारशेडचा, तर #CarShedWahiBanega.. म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच”, असं कॅप्शन सुमीतने दिलेलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आपल्या हातात येताच ‘मेट्रो ३’ साठीचे कारशेड आरे येथेच होणार असल्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंकर आरे येथे कारशेड बनवू नका असे म्हणाले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला निर्णय अटळ असल्याचे म्हटले. त्यामुळे आता येत्या काळात आरे वरून अनेक वाद रंगू शकतात. मात्र बऱ्याच मुंबईकरांची आरे येथे कारशेड व्हावं अशी मागणी आहे, तर पर्यावरण प्रेमींकडून याला तीव्र विरोध केला जात आहे.


हेही वाचा :लोणावळ्यात पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम; पिकनिक दरम्यानचे फोटो व्हायरल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -