सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘The Kapil Sharma Show’? कपिलसोबत वादाची चर्चा

sumona chakrabarty leaving kapil sharma show and starting her own show shona bangal
सुमोना चक्रवर्तीने सोडला 'The Kapil Sharma Show'? कपिलसोबत वादाची चर्चा

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो द कपिल शर्मा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमंत्रित न केल्यामुळे हा शो वादात सापडला होता. अशात आता अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती देखील शो सोडत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कपिलच्या शोमध्ये वेगळी भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती आता कपिल शर्मासोबत दिसणार नाही.

विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वादानंतर सुमोनाने शो सोडण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, सुमोनाने याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. सुमोना एका नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहे. सुमोनाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून प्रेक्षकांना याची माहिती दिली आहे. त्यासाठीच ती कपील शर्मा शोमधून ब्रेक घेणार आहे.

सुमोना कपिलचा शो सोडून ‘शोनार बंगाल’ नावाचा बंगाली ट्रॅव्हल शो करत आहे. या शोमधून सुमोनाच्या माध्यामातून आपल्या बंगालचे सौंदर्य पाहता येणार आहे. झेस्टवर ३० मार्चपासून हा शो सुरू झाला आहे. हा शो 10 भागांची एक सीरिज असून ज्यामध्ये आपण बंगालला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत.

सुमोनाने या शोचे अनेक प्रोमो व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून वाटते ती या नवीन शोबद्दल खूप आनंदी असल्याचे स्पष्ट होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा झी झेस्टची टीम त्याच्याकडे हा शो घेऊन पोहोचली, तेव्हा त्याने या शोचा भाग होण्याचे ठरवले होते. सुमोनाला प्रवास करणे, नवीन ठिकाणांना भेट देणे आणि इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित गोष्टी एक्सप्लोर करणे आवडते.

सुमोना एका अन्य शोचा भाग बनली आहे, तर दुसरीकडे कपिलच्या शोचे शूटिंगही लवकरच थांबणार आहे. कपिलमुळे शोच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.  खरंतर कपिल एका महिन्यासाठी अमेरिकेला जाणार आहे, त्याच्याशिवाय शोचे शूटिंग शक्य होणार नाही. त्यामुळे काही दिवसांसाठी शो ऑफ एअर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही भाग आगाऊ शूट केले जातील.


वाडा तालुका हा पर्यटकांचा ठरतोय वाटाड्या, निसर्गरम्यस्थळी पुरातन मंदिरं ठरताहेत विलोभनीय