Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनSuniel Shetty : सुनील शेट्टीच्या केसरी वीर सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर

Suniel Shetty : सुनील शेट्टीच्या केसरी वीर सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर

Subscribe

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सूरज पंचोली अभिनीत ‘केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ हा बहुप्रतिक्षित पीरियड ड्रामा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता सतत वाढत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे निर्माते कनु चौहान यांनी नुकतीच सिनेमाची बदललेली रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा येत्या 14 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट 16 मे 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (suniel shetty movie kesari Veer new release date declared)

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, ‘केसरी वीरसाठी आम्हाला मिळालेले प्रेम आणि उत्साह अविश्वसनीय आहे. या ऐतिहासिक कथेशी प्रेक्षकांना अधिक खोलवर जोडण्यासाठी, आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 16 मे 2025 पर्यंत वाढवत आहोत. ‘केसरी वीर’ पवित्र सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी लढलेल्या ऐतिहासिक लढाईची गाथा जिवंत करते. या चित्रपटात, सुनील शेट्टी एका अनुभवी योद्धा ‘वेगडाजी’ची भूमिका साकारत आहे. जो आपल्या मातृभूमीचा अटल रक्षक आहे.

तर या सिनेमात सूरज पंचोली ‘राजपूत राजकुमार हमिरजी गोहिल’ यांची भूमिका साकारणार आहे. हे दोन शूर योद्धे एकत्रितपणे भयंकर आक्रमणकर्ता ‘जफर खान’सोबत सामना करणार आहेत. जफरच्या भूमिकेत विवेक ओबेरॉय दिसणार आहे. रणनीती, धैर्य आणि दृढनिश्चय वापरून, ते त्यांच्या भूमीचे आणि त्यांच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी लढताना दिसतील. युद्धाच्या गोंधळात, हमिरजी गोहिलला त्याची मैत्रीण ‘राजल’ (आकांक्षा शर्मा) सोबतच्या नात्यात समाधान मिळते. ज्यामुळे कथेत प्रेम, त्याग आणि सन्मानाचे भावनिक पैलू देखील प्रतिबिंबित होतात.

या सिनेमात सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय, आकांक्षा शर्मा आणि सूरज पंचोली यांच्या मुख्य भूमिका आहेत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती चौहान स्टुडिओजच्या बॅनरखाली कानू चौहान यांनी केली आहे. पॅनोरमा स्टुडिओजने जगभरात प्रदर्शित केलेला, हा चित्रपट अ‍ॅक्शन, भावना आणि नाट्याचे उत्कृष्ट मिश्रण देण्याचे आश्वासन देतो. 16 मे 2025 रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी दाखल होत आहे.

हेही पहा –

Lakshmi Niwas Serial : जान्हवी आणि भावनाचं आयुष्य काय नवीन वळण घेणार?