बऱ्याच वर्षांनंतर तीच एनर्जी घेऊन सुनील शेट्टी ‘आँखों में बैसे हो तुम’वर थिरकला, पाहा VIRAL VIDEO

लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत, काही जण सुनील शेट्टीला 'जुनी वाइन' म्हणत आहेत.

suniel shetty video

एकीकडे सुनील शेट्टी त्याच्या कॉमेडी जॉनर चित्रपट ‘हेरा फेरी 3’मुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे तो ‘हंटर’ या वेब सीरिजसाठी देखील प्रचंड चर्चेत आला आहे. हंटर एक अ‍ॅक्शन पॅक्ड थ्रिलर मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी गुन्हेगारांना मारहाण करताना दिसत आहे. सुनील शेट्टीला अॅक्शन अवतारात पाहून लोक त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. अशात सुनील शेट्टीचा आणखी एका कारणासाठी चर्चेत आलाय तो म्हणजे त्याचा नवा डान्स व्हिडीओ…या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी त्याच्याच जुन्या गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. लोक त्याच्या या डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी नॉर्वेच्या प्रसिद्ध डान्स ग्रुप ‘द क्विक स्टाइल ग्रुप’सोबत हटके डान्स करत आहे. सुनील शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इतक्या वर्षांनंतर तो पुन्हा एकदा त्याच्याच ‘टक्कर’ चित्रपटातील ‘आँखों में बेस हो तुम’ गाण्यावर थिरकताना दिसला. चाहत्यांव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार्सही या व्हिडीओवर भरभरून कमेंट आणि लाईक करत आहेत.

सुनील शेट्टीची अशी अनेक गाणी आहेत जी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यातील एक गाणे म्हणजे आँखों में बसे हो तुम…. याच गाण्यावरील सुनील शेटीला इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा त्याच जोशमध्ये डान्स करताना पाहून चाहते आनंदी झाले आहेत. या मूळ गाण्यात सोनाली बेंद्रे सुनील शेट्टीसोबत दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Quick Style (@thequickstyle)

वडील सुनील शेट्टीचा डान्स व्हिडीओ पाहून सुनील शेट्टीचा मुलगा अहान आणि मुलगी अथियाही स्वतःला रोखू शकले नाहीत आणि कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला. अथियाने कमेंटमध्ये ‘बेस्ट’ असं लिहीत एक स्मायली देखील पोस्ट केलीय. तर मुलगा अहाननेही वडिलांच्या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ‘मला हे वडील आवडतात’, असं त्याने यात कमेंट केली आहे.

लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत, काही जण सुनील शेट्टीला ‘जुनी वाइन’ म्हणत आहेत. सुनील शेट्टी सध्या त्याच्या आगामी ‘हेरा फेरी 3’ आणि ‘हंटर’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. दुसरीकडे, हंटर मालिकेबद्दल बोलायचं झालं तर सुनील शेट्टी या चित्रपटात एसीपी विक्रमची भूमिका साकारत आहे, जो पैशासाठी कोणत्याही हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊ शकतो. ही मालिका Amazon Mini TV वर प्रदर्शित झाली आहे.