‘कान’च्या रेड कार्पेटवर गुत्थीची एंट्री, व्हाईट गाऊनमध्ये सुनील ग्रोव्हरचा हटके लूक व्हायरल

Sunil grover cannes 2022 red carpet look viral
'कान'च्या रेड कार्पेटवर गुत्थीची एंट्री, व्हाईट गाऊनमध्ये सुनील ग्रोव्हरचा हटके लूक व्हायरल

हिंदी कला विश्वात कॉमेडीच्या जोरावर लोकांना खळखळून हसवणार अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर (Sunil Grover). सुनील लोकांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडिया असो किंवा एखादा जाहीर कार्यक्रम हास्याचे फटाके तो नेहमीच फोडत असतो. नुकतंच त्यांने एक मजेशीर फोटो त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर शेअर  केला आहे. कान फिल्म फेस्टीवल(2022 Cannes Film Festival) मधील.

कानच्या रेड कार्टपेटवर सुनील ग्रोव्हरची एंट्री

सुनीलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बहुप्रतिष्ठीत कान फिल्म फेस्टीवल 2022 च्या रेड कार्पेटवर झळकत आहे. फोटोध्ये सुनील त्याच्या लोकप्रिय अशा गुत्थीच्या लूकमध्ये दिसतोय. गुत्थीने व्हाईट लॉंग गाऊन घातला आहे. यासह  त्यावर फुलपाखरांच्या पंखाप्रमाणे जांभळ्या रंगाचा बो दिसत आहे. गुत्थीने नेहमीप्रमाणे दोन वेण्या बांधल्या आहेत. आणि कानच्या फोटोशूटमध्ये गुत्थीने आपल्या आवडत्या पोझमध्ये फोटो काढलाय. या सुंदर अशा फोटोला तिने ‘फ्रेंच रिव्हिएरा’ असं कॅप्शन दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

गुत्थीचा स्टायलिश अवतार सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान सुनील ग्रोव्हर थेट कानच्या रेड कार्पेटवर कसा पोहोचला हे पाहून तुम्ही देखील विचारात पडला असाल. यामागची सत्य परिस्थिती जाणून घेऊया. खरं तर सुनील ग्रोव्हरने शेअर केलेला हा फोटो मॉर्फ केला गेलाय. दरम्यान सुनीलचा हा फोटो पाहून याला एडीट करण्यात आलंय याची शंका देखील क्वचितच लोकांना आली असेल. गुत्थीला अशा लूकमध्ये पाहून सर्वच आश्चर्यचकीत झालेत. दरम्यान चाहत्यांना देखील गुत्थीला पाहून हसू आवरता आले नाहीये

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल शो’मधून सुनील ग्रोव्हरच्या गुत्थी या पात्राला ओळख मिळाली. गुत्थीने आपल्या खास स्टाईलने लोकांच्या मनामध्ये  जागा निर्माण केली . आपल्या कॉमेडीने लोकांना हसवल्यानंतर सुनील ग्रोव्हर आता चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून अभिनयाची विविध पैलू त्याने उलगडले.


हे ही वाचा – Bhool Bhulaiyaa 2: कार्तिकने घेतला कंगनाशी पंगा, बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया 2’ ठरला सुपरहिट