Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन केएल राहुल- अथियाच्या नात्यावर वडील सुनिल शेट्टींनी सोडले मौन

केएल राहुल- अथियाच्या नात्यावर वडील सुनिल शेट्टींनी सोडले मौन

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्यातील रिलेशनशिपची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरूनही ते एकमेकांना डेट करत असल्याचे दिसून येतयं. दोघेही सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहेत. यात आपल्या सोशल मीडियावरून दोघेही एकमेकांचे फोटो शेअर करत असतात,. त्याचबरोबर त्या फोटोंना कमेंट करत असतात. परंतु अथिया आणि केएल राहुलने आपल्या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु दोघेही एकमेकांच्या फोटोंवर करत असलेल्या कमेंट्स पाहून नेटकऱ्यांनी यांच्यात काहीतरी शिजतयं असा अंदाज वर्तवला आहे.

टीम इंडिया इंग्लंडच्या दौर्‍यावेळी अथिया शेट्टी केएल राहुलसोबत दिसून आली. यावेळी केएल राहुलने अधिकृतपणे अथिया शेट्टीबद्लच्या नात्यावर आपली कबूली दिली. मात्र आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनी या दोघांच्या नात्यावरील मौन सोडले आहे. सुनील शेट्टी यांनी माध्यामाशी बोलताना म्हणाले की, हो. अथिया सध्या इंग्लंडमध्येच आहे. परंतु ती तिथे भाऊ अहानसोबत सुट्टीसाठी गेली आहे. दोघेही भाऊ-बहिण इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. बाकी तुम्ही बघू शकता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

- Advertisement -

परंतु सुनील शेट्टी यांनी मुलगी अथियाच्या रिलेशनशिपबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. परंतु त्यावर उत्तर देणे त्यांनी टाळले. परंतु राहुल आणि अथियाची जोडी चांगली दिसत असल्याचेही त्यांनी मान्य केले. अथिया आणि राहुल हे दोघेही एका ब्रँडचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ आहेत.

- Advertisement -

या मुद्दावर स्पष्टीकरण देत सुनील शेट्टी म्हणाले की, ”जाहिरातीबद्दल बोलायचे झाले, तर एका आंतरराष्ट्रीय ब्रँडने त्या दोघांनाही अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. ते एकमेकांना साजेसे आणि शोभणारे जोडपे आहे. ब्रँडच्या दृष्टिकोनातून बोलायचे झाले तर ते चांगले काम करत आहेत. मला जाहिरातीमध्ये हे दोघे एकत्र खूप चांगले दिसत आहेत.”

इंग्लंडमध्ये अथिया केएल राहुलसोबतच आहे का?

काही काळापूर्वी अथिया शेट्टीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अथियाने एक जॅकेट परिधान केले आहे. हेच जॅकेटनंतर केएल राहुलनेही घातले होते. या जॅकेटवरचे काही फोटो केएल राहुलने शेअर केली होती. इतकेच नाही तर अथियाने जो फोटो केला होता त्यात एका हॉटेलचा रुम दिसत होता. इतकेच नव्हे तर केएल राहुलने अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टीसोबत एक चित्र शेअर केले आहे. तो इंग्लंडच्या रस्त्यावर त्यांच्याबरोबर फिरताना दिसला.


ऐश्वर्या राय बच्चन इंस्टाग्रामवर केवळ ‘या’ एकाचं व्यक्तीला करतेयं फॉलो


 

- Advertisement -