घरमनोरंजनबॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिड्सची एंट्री, सुनील शेट्टीच्या मुलाने केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिड्सची एंट्री, सुनील शेट्टीच्या मुलाने केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Subscribe

अहान 'तडप'(tadap) या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत दाखल होणार आहे. या सिनेमात अहान अभिनेत्री तारा सुतारिया (tara sutaria) सोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आलिया भट्ट,जान्हवी कपूर,सारा आली खान, टायगर श्रॉफनंतर आता इंडस्ट्रीमध्ये आणखी एका स्टारकिड्सची भर पडत आहे. अभिनेता सुनिल शेट्टीचा(sunil shetty) मुलगा अहान शेट्टी (ahan shetty)आता बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज होत आहे. अहान ‘तडप'(tadap) या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत दाखल होणार आहे. या सिनेमात अहान अभिनेत्री तारा सुतारिया (tara sutaria) सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ‘तडप’ सिनेमाच्या प्रर्शनाची तारिख देखील मेकर्सने जाहीर केली असून येत्या 3 डिसेंबर रोजी सिनेमा रुपेरी पद्यावर दाखल होणार आहे.(sunil shetty son enter in bollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

- Advertisement -

तारा सुतारियाने दोन वर्षांपूर्वी या ‘शोबिज’च्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर ताराने अनेक सिनेमात आपलया अभिनय कौशल्येच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. आता ‘तड़प’ सिनेमातील अहान आणि ताराच्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांमध्ये उत्साहाची एक मोठी लाट निर्माण झाली आहे. आणि अहान आणि ताराची फ्रेश जोडी चाहत्यांना कीतपत पसंतीस उतरते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

‘तड़प’ मिलन लूथरिया यांनी दिग्दर्शित चित्रपट केला असून अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे निर्माण साजिद नाडियाडवाला यांच्याद्वारे करण्यात आले असून फॉक्स स्टार स्टूडियोद्वारा सह-निर्मित आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर भाऊ फैजल खानचे मोठे विधान,दुसऱ्या लग्नाविषयी म्हणाला…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -