घरमनोरंजनलेकीच्या लग्नात पारंपरिक पोशाखात दिसला सुनील शेट्टी

लेकीच्या लग्नात पारंपरिक पोशाखात दिसला सुनील शेट्टी

Subscribe

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहूल यांचे लग्न आज थाटामाटात पार पडले आहे. मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर आज 4:30 वाजता दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाचे सगळे विधी पूर्ण होताच दोघेही मीडियासमोर येणार आहेत. दरम्यान, अशातच सुनील शेट्टी आणि अहान शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

आज सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर आथिया आणि केएल राहुलचा विवाह पार पडला. जवळचे नाते आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. विवाह संपन्न झाल्यावर सुनील शेट्टी आणि अहानने आनंदाने प्रसार माध्यमांच्या उपस्थित प्रतिनिधींना मिठाई वाटली.

- Advertisement -

पारंपारिक पोशाखात दिसला सुनील शेट्टी
यावेळी सुनील शेट्टीने दाक्षिणात्य पद्धतीचा पोशाख परिधान केला होता. यावेळी त्याने साधा कुर्ता आणि लुंगी घातली होती. तसेच गळ्यात माळ आणि पायात कोल्हापूरी चप्पल घातली होती. सुनील शेट्टीच्या या पारंपारिक पोशाखाने सर्वांचेच लक्ष वेधले. अनेकजण त्याच्या पेहरावाचे कौतुक करत आहेत.

- Advertisement -

तसेच यावेळी सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी देखील यावेळी देसी लूकमध्ये दिसत होता. अहानने पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता व जॅकेट परिधान केलं होतं.

3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत
राहुल आणि आथिया शेट्टी गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कोरोनाकाळात फक्त कुटुंबातील सदस्यांना खेळाडूंसोबत भेटण्याची परवानगी होती तेव्हा अथिया आणि राहुल इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या कॅम्प सोबत दिसले होते.


हेही वाचा : 

‘पठाण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद; प्रदर्शनापूर्वीच कमावले ‘इतके’ कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -