HomeमनोरंजनSunita Ahuja : नवऱ्यांवर विश्वास ठेवू नये, गोविंदाची पत्नी असं का म्हणाली?

Sunita Ahuja : नवऱ्यांवर विश्वास ठेवू नये, गोविंदाची पत्नी असं का म्हणाली?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या हटके डान्स स्टाईलमुळे फार प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही दिवसात त्याच्या कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्याची चर्चा जास्त रंगली आहे. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. कोणत्याही विषयावर थेट आणि परखड बोलताना ती मागचा पुढचा विचार करत नाही. अलीकडेच एका मुलाखतीत तिने म्हटले, गोविंदाच्या बेरोजगार असण्याने ती असुरक्षित झाली आहे. कारण त्याच्याकडे काम नसल्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकते. यावेळी तिने स्वतःच्या करिअरचा विचार करत असल्याचेही सांगितले. या मुलाखतीत सुनीता नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊया.(Sunita Ahuja statement about her husband govinda goes viral)

मी करिअरचा विचार केला नाही

एका नामांकित वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली, ‘मला 1986 मध्ये तन बदन या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. ज्यात गोविंदालाही काम मिळाले होते. हा सिनेमा माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा होता. पण मला यात काम करायचे नव्हते. मग ते काम खुशबूला मिळाले. मी माझ्या आईला आमच्या कुटुंबाची काळजी घेताना आणि घर सांभाळताना पहायची. त्यामुळे माझे पूर्ण लक्ष फक्त लग्न करून गृहिणी होण्याकडे होते. मी कधीच माझ्या करिअरचा विचार केला नाही. पण आता तसं काही उरलं नाही. त्यामुळे कोणीही 50 व्या वर्षी काम सुरू करू शकतं आणि मीसुद्धा याच विचारात आहे’.

मला एकटेपणा जाणवतो

पुढे बोलताना सुनीता म्हणाली, ‘आतापर्यंत गोविंदाचे काम मी मॅनेज केले आहे. पण गेल्या 2 वर्षांपासून तो कोणतेच काम करत नाही. ज्यामुळे माझ्याही हाताला काही काम नाही. पण आता मला स्वतःसाठी काहीतरी करायचे आहे. मला खूप एकटेपणा जाणवतो. त्यामुळे मला सतत व्यस्त रहायचे आहे. सध्या मी एका कॉमेडी शोसाठी जज म्हणून काम करण्याचा विचार करतेय. मी दिसायला तशी बरी आहे. शिवाय टीना माझ्यासोबत पॉडकास्टवर काम करतेय. याव्यतिरिक्त बऱ्याच कल्पना आहेत ज्यावर आम्ही काम करतोय’.

साठी बुद्धी नाठी

यावेळी सुनीताने गोविंदाच्या करिअरविषयी बोलताना म्हटले, ‘हृदयावर दगड ठेवावा लागतो. कारण कधी इथे लिंक अप कधी तिकडे.. याआधी तो सलग काम करत होता. त्यामुळे अफेअर करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. पण आता तो काहीही काम करत नाही. ज्यामुळे त्याच कुठेतरी अफेअर सुरू होईल अशी भीती मला सारखी वाटते. वयाच्या साठीनंतर लोक पागल होतात. म्हणून मला सतत अस्वस्थ वाटत राहते’.

नवऱ्यांवर विश्वास ठेवू नये

यावेळी सुनीताने विवाहित महिलांनी नवऱ्यावर अवलंबून राहू नये असे म्हटले. ‘नवरे गिरगिटसारखे असतात. सतत रंग बदलतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये’, असेही तिने म्हटले. पुढे म्हणाली, ‘मुलांवरही विश्वास ठेवू नका. एकदा मोठी झाली की त्यांची त्यांची आयुष्य सुरु होतात. त्यामुळे स्वतःचे आयुष्य जगा. एका वयानंतर प्रत्येक महिलेने स्वतःसाठी जगायला हवे’.

हेही पहा –

Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 ओटीटीवर येणार, कधी आणि कुठे स्ट्रीम होणार?